शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

नर्सरी बागेत शाही शिवजयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 4:40 PM

छत्रपती घराण्याच्या वतीने बुधवारी टाऊन हॉल उद्याननजीक नर्सरी बागेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक मंदिरात शाही शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाहू छत्रपती आणि यौवराज यशराज यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजन्मकाळ उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ‘जय भवानी - जय शिवाजी’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. ​​​​​​​

ठळक मुद्दे‘जय भवानी - जय शिवाजी’चा गजर शाहू छत्रपती, यौवराज यशराजेंनी केले पूजन

कोल्हापूर : छत्रपती घराण्याच्या वतीने बुधवारी टाऊन हॉल उद्याननजीक नर्सरी बागेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक मंदिरात शाही शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाहू छत्रपती आणि यौवराज यशराज यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजन्मकाळ उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ‘जय भवानी - जय शिवाजी’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.छत्रपती ट्रस्टच्या मालकीच्या नर्सरी बागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे ऐतिहासिक मंदिर आहे. नेहमीप्रमाणे येथेही छत्रपती घराण्याच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येते. सकाळी भवानी मंडप येथे जुना राजवाडा येथून भालदार, चोपदार यांचा लवाजमा नित्यनियमानुसार आला. त्याचवेळी न्यू पॅलेसवरून रीतिरिवाजाप्रमाणे शाहू छत्रपती व यौवराज यशराजे हे सकाळी नर्सरी बागेत पोहोचले.

परिसरात उभारलेल्या राजेशाही शामियान्यात ललकारी, स्थानापन्न कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी काहीवेळ ऐतिहासिक पोवाडा, शाहू संगीत विद्यालयातील विद्यार्थिनींची गाणी ऐकली. त्यानंतर शाहू छत्रपती आणि यौवराज यशराजे यांनी मंदिरात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून फुलांनी सजविलेल्या चांदीच्या पाळण्याची पूजाही केली. जन्मोत्सवानंतर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा देण्यात आल्या.शाहू छत्रपती, यौवराज यशराज यांनी एकत्रित मिळून राजर्षी शाहू समाधी स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. या कार्यक्रमासाठी नील पंडित-बावडेकर, बंटी यादव, बाबा चव्हाण, ट्रस्टी राजेंद्र चव्हाण, प्रवीण इंगळे, प्रसन्ना मोहिते तसेच शाहू संगीत विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संस्थेने उपस्थित होते. 

 

टॅग्स :Shivjayantiशिवजयंतीkolhapurकोल्हापूर