गडहिंग्लजला रोट्रॅक्टचे पदग्रहण उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:18 IST2021-07-10T04:18:18+5:302021-07-10T04:18:18+5:30

रोट्रॅक्ट क्लब ऑफ गडहिंग्लजचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. नूतन अध्यक्ष प्रांजली पाटील, सचिव सिद्धांत उंदरे व ओंकार जोशी ...

Rotaract's inauguration to Gadhinglaj in excitement | गडहिंग्लजला रोट्रॅक्टचे पदग्रहण उत्साहात

गडहिंग्लजला रोट्रॅक्टचे पदग्रहण उत्साहात

रोट्रॅक्ट क्लब ऑफ गडहिंग्लजचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. नूतन अध्यक्ष प्रांजली पाटील, सचिव सिद्धांत उंदरे व ओंकार जोशी यांना साहिल गांधी यांनी पदग्रहणाची शपथ दिली.

मावळते अध्यक्ष अनमोल सुतार यांनी गतवर्षीच्या कामकाजाचा आढावा घेतला. नूतन अध्यक्ष पाटील यांनी आगामी वर्षाचे नियोजन विशद केले.

यावेळी रोट्रॅक्ट गडहिंग्लचे संस्थापक डॉ. स्फूर्ती कांबळे, लायन्स क्लबचे जिल्हा सचिव राजेंद्र वडगुले, गडहिंग्लजचे सचिव सूरज तोरगल्ली, सुपर अभिनव अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष एस. बी. पाटील, प्रियांका गोंदालिया, अमर देवगोंडा आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : गडहिंग्लज येथे रोट्रॅक्ट क्लबचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी साहिल गांधी, राजेंद्र वडगुले, सूरज तोरगल्ली, एस. बी. पाटील, अनमोल सुतार, अमर देवगोंडा, स्फूर्ती कांबळे आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०९०७२०२१-गड-१५

Web Title: Rotaract's inauguration to Gadhinglaj in excitement