शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांचे पैसे सरपंचाच्या खिशात

By admin | Updated: July 11, 2014 00:11 IST

सावर्डे बुद्रुक येथील प्रकार : तिघांच्या चौकशीची मागणी

मुरगूड : रस्त्यांची कामे न करताच हजारो रुपयांची बिले संगनमताने परस्पर उचलण्याचा प्रकार कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रुक येथे घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी सरपंच डॉ. इंद्रजित पाटील, ग्रामसेविका टी. जे. अत्तार व पंचायत समिती बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आर. आर. खान यांची चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सूर्यवंशी तसेच सावर्डे बुद्रुक ग्रामपंचायत आणि कागल पंचायत समितीकडे दिले. याप्रकरणी कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, सावर्डे (ता. कागल) येथील पाटील गल्ली, काशीद अड्डा, दिरुगडे अड्डा व लक्ष्मी नगर या वसाहतीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर खडीकरण करण्याचा पंचायतीच्या सभेत ३० नोव्हेंबर २०१३ ला ठराव मंजूर केला होता; पण त्यानंतर गावातील कोणत्याच रस्त्यांची कामे झाली नाहीत. खडीकरणासाठी कुठेच मुरूम टाकला नाही; पण याबाबत ५५ हजारांची खोटी बिले सादर करून पैसे मात्र उचलल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे, पाच वर्षांपूूर्वी पाटील गल्लीमध्ये शासनाच्या योजनेतून काँक्रिटीकरण केले होते आणि चक्क ग्रामपंचायतीने याच रस्त्यावर मुरूम टाकल्याचे दाखविल्याने त्यांचे पितळ उघडे पडले आहे. गावापासून थोड्या अंतरावर असणाऱ्या भैरेवाडी वसाहतीच्या रस्त्यावरच काशीद अड्डा आहे. पण, या त्रिकुटाने हे दोन रस्ते वेगवेगळे आहेत, असे दाखवून बिलांची उचल केली आहे. सोनाळी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या हिरुगडे अड्डयावरील ग्रामस्थांनी वर्गणी काढून खडीकरण केले होते. तसेच गावालगतच्या पश्चिमेला असलेल्या लक्ष्मी नगरकडे जाण्यासाठी काही दिवसांपूर्वीच डांबरीकरण केले आहे. पण, या रस्त्यावर पंचायतीने मुरूम टाकल्याचे कागदोपत्री दाखविले आहे. यासर्व भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी वरिष्ठांकडे संपर्क साधला. आपल्या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सूर्यवंशी यांना दिले; पण अद्याप चौकशी झाली नसल्याने ग्रामस्थांतील उद्रेक वाढला आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या निवेदनावर बाबासाहेब पाटील, धनाजी घराळ, वि. दा. पाटील, विश्वनाथ पाटील, तानाजी घराळ, कृष्णात हिरुगडे, संजय मेंगाणे, आदींच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)ं