शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शिरोली नाक्यावर रस्ता रोखला

By admin | Updated: October 15, 2014 00:30 IST

टोलवसुलीचे पडसाद : अर्धा तास वाहतूक ठप्प; आय.आर.बी.च्या विरोधात घोषणाबाजी

कोल्हापूर : टोलवसुलीबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या विरोधी निकालाचे पडसाद आज, मंगळवारी कोल्हापुरात उमटले. सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने आय.आर.बी. कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत, शिरोली नाका परिसरात सायंकाळी समितीतील कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी सुमारे अर्धा तास रस्ता रोखून धरला. उद्या, बुधवारी विधानसभेसाठी होणाऱ्या मतदान पेटीमधून राज्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहनही यावेळी कार्यकर्त्यांनी करीत तीव्र भावना व्यक्त केल्या. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची धांदल उडाली.कोल्हापुरात आय.आर.बी. या कंपनीने ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर रस्ते केले. मात्र, हे रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप टोलविरोधी कृती समितीने केला आहे. दरम्यान, याप्रश्नी न्यायालयात जनहित याचिका दाखल होत्या. आज, मंगळवारी न्यायालयाने या याचिका फेटाळल्या. त्यामुळे सायंकाळी शिरोली टोलनाका परिसरात ‘पॅटको’समोर प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. त्यामुळे वाहतूक अर्धा तास ठप्प झाली. ‘आय.आर. बी.चा बोका, दिसेल तेथे ठोका’ अशा घोषणा देत कोणत्याही स्थितीत टोल न देण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला. आंदोलनात गोविंद पानसरे, बाबा पार्टे, अशोक पोवार, दिलीप पवार, दीपा पाटील, जयकुमार शिंदे, चंद्रकांत यादव, महादेव पाटील, रमेश मोरे, आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)चार वर्षे टोल आंदोलन सुरू आहे. या शासनकर्त्यांना बुधवारी होणाऱ्या मतदानातून घालवा. आम्ही टोल घालविण्याशिवाय शांत बसणार नाही. त्यामुळे २० आॅक्टोबरपासून नवीन लोकप्रतिनिधींसमोर हे आंदोलन करणार आहोत.- बाबा इंदुलकर, टोलविरोधी कृतीसमिती कार्यकर्ते.जनतेच्या न्यायालयात टोलचा प्रश्न सोडवू. यापुढील काळातही हे आंदोलन सुरू राहील.- दिलीप देसाई,टोलविरोधी कृती समितीचे कार्यकर्ते.टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांची 'धूम'आंदोलनावेळी आंदोलक शंभर मीटरच्या पुढे थांबून राहिले असता एक आंदोलक टोलनाक्याच्या दिशेने गेला. त्यावेळी हा आंदोलक आपल्याकडे येतो, हे पाहून शिरोली टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी टोलवसुली बंद करीत केबिनमधून धूम ठोकली.