शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरू

By admin | Updated: August 3, 2014 01:45 IST

कामकाज ठप्प : शासकीय कार्यालयात शुकशुकाट

कोल्हापूर : राज्य सरकारकडे महसूूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने पुकारलेला बेमुदत संप आज, शनिवारीही सुरू होता. संपात जिल्ह्यातील सुमारे साडेआठशे कर्मचारी सहभागी झाले असल्याने, महसूल विभागाशी संबंधित असलेली सर्व कार्यालये दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांविना ओस पडली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत माघार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. जिल्ह्यातील तहसीलदार, प्रांत कार्यालय, पुरवठा विभाग, सेतू, संजय गांधी निराधार योजना यांच्यासह सर्वच शासकीय कार्यालयांतील कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यांमध्ये शिपाई, कोतवाल, कारकून, अव्वल कारकून, वाहनचालक, लिपिक संवर्गातील नायब तहसीलदार यांचा समावेश आहे. आज दुपारपर्यंत संपात सहभागी झालेले जिल्ह्यातील सर्व कर्मचारी महावीर उद्यान येथे थांबून होते. त्यामुळे कार्यालयातील काम ठप्प राहिले. कामानिमित्त आलेल्या लोकांची यामुळे चांगलीच गैरसोय झाली. या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बुधवारी (दि. ६) मुंबई येथे महसूल मंत्र्यांनी बैठक बोलाविली आहे. तरीही संप सुरूच ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. आंदोलनाचा भाग म्हणून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (दि. ४) सर्व कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारणार आहेत. आंदोलनात संघटनेचे नेते विलासराव कुरणे, सुनील देसाई, प्रीती ढाले, अविनाश सूर्यवंशी, प्रसाद वडणेकर, माणिक निगवेकर, बबन शिंदे, विनायक लुगडे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)