शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

‘एचआरसीटी’द्वारे कोविड निदान करणाऱ्या रुग्णालयांवर घातली बंधने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:50 IST

कोल्हापूर : हाय रिझोल्युशन कॉम्प्युटराईज्ड टोमोग्राफी (एचआरसीटी) द्वारे कोविड निदान करून रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर राज्य शासनाच्या सार्वजनिक ...

कोल्हापूर : हाय रिझोल्युशन कॉम्प्युटराईज्ड टोमोग्राफी (एचआरसीटी) द्वारे कोविड निदान करून रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने काही बंधने घातली आहेत. जरी ‘एचआरसीटी’द्वारे निदान पॉझिटिव्ह आले तरी संबंधित रुग्णाची २४ तासांच्या आत आरटीपीसीआर चाचणी करणे आणि तिची माहितीही स्थानिक प्रशासनास देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

केंद्र सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या मार्गदर्शनानुसार आरटीपीसीआर व ॲन्टीजेन चाचणी सकारात्मक आली तरच तो रुग्ण कोविड १९ चा समजून त्यावर उपचार करण्याच्या सूचना आहेत. तरीही काही खासगी रुग्णालये एचआरसीटी ही चाचणी कोविड निदानासाठी वापरत आहेत आणि या चाचणीच्या आधारे रुग्णांवर कोविडचे उपचार करीत आहेत. एचआरसीटी चाचणीत कोविडसदृश बाबी दिसल्यामुळे चुकीचे निदान होऊन रुग्णास आवश्यक नसताना कोविड-१९ चे उपचार दिले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणूनच सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी बुधवारी नवीन अधिसूचना जारी केली.

एचआरसीटीद्वारे कोविड १९ चे निदान केलेल्या प्रत्येक व्यक्तीचे नाव, संपर्क क्रमांक, पूर्ण पत्ता, इत्यादी माहिती संबंधित निदान केंद्रांनी स्थानिक प्रशासनास द्यावी. प्रत्येक नगरपालिका व महानगरपालिका त्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करील. रुग्णाचा एचआरसीटी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास २४ तासांत त्याची आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. जर ही चाचणीही पॉझिटिव्ह आली तर राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड १९ साथ नियंत्रणासाठी निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची चाचणी करणे तसेच लक्षणांनुसार अलगीकरण, विलगीकरण व उपचार करावेत, अशी बंधने या अधिसूचनेद्वारे घालण्यात आली आहेत.

कोविड साथीचा गैरफायदा घेत काही खासगी रुग्णालये आरटीपीसीआर चाचणीऐवजी एचआरसीटी चाचणी करण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळे रुग्णांची फसवणूक तर होतेच; शिवाय अशा रुग्णांमुळे नेमकी माहिती प्रशासनास मिळत नसल्याने साथ वाढण्याचा धोका आहे. आरोग्य विभागाच्या अधिसूचनेमुळे त्याला आता चाप बसेल.