शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

दर्जेदार रस्त्यांची जबाबदारी अधिकाऱ्यांची

By admin | Updated: November 13, 2014 00:01 IST

नेत्रदीप सरनोबत : कामांत हलगर्जीपणा केल्यास ‘गय’ नाही, अडथळा आणल्यास फौजदारी

कोल्हापूर : शहरातील रस्त्यांची चाळण झाल्यानंतर जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने आता १५०हून अधिक रस्त्यांची दुरुस्ती व बांधणी हाती घेतली आहे. नव्याने करण्यात येणाऱ्या रस्त्यांची बांधणी दर्जेदार करण्याची जबाबदारी ठेकेदारांचीच असेल; मात्र या रस्त्याच्या कामावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी बांधकाम विभागातील सर्व अधिकाऱ्यांची आहे. रस्ते कामांत हलगर्जीपणा केल्यास गय केली जाणार नाही, अशी सक्त ताकीद आज, बुधवारी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी महापालिकेतील अभियंत्यांच्या बैठकीत दिली.नगरोत्थान योजनेतील ३९ किलोमीटरचे रस्ते व इतर शासकीय अनुदानातून करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे काम वेळेत व दर्जेदार काम न करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक रकमेसह कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय स्थायी समितीने यापूर्वीच घेतला आहे. मुदतीत काम सुरू न करणाऱ्या ठेकेदारांवर पाच ते दहा हजार रुपये दरदिवशी दंड ठोठावण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या रस्त्याच्या कामाची सुरुवात झाली आहे. सर्व्हे, गळती काढणे, टेस्ट रिपोर्ट, आदी तांत्रिक बाबींची पूर्तता केली जात आहे.शहरातील ३८.५० किलोमीटरचे अंतर्गत रस्ते करण्यासाठी १०८ कोटींच्या निधीची तरतूद करूनही ठेकेदारांनी पाठ फिरविल्याने रेंगाळलेला हा प्रकल्प आता पुन्हा सुरू होणार आहे. तसेच इतर लहान-मोठे १५०हून अधिक रस्ते करण्यात येणार आहेत. कामात अडथळा आणणाऱ्या नगरसेवकांवर थेट फौजदारी दाखल करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आता वेळेत रस्त्याची कामे पूर्ण करण्याचे दिव्य प्रशासनाला करावे लागणार आहे. नागरिकांच्या तगाद्यामुळे प्रशासनानेही दर्जेदार रस्त्यासाठी कंबर कसल्याचे चित्र आहे.शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. प्रशासनानेही रस्ते दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सर्व कनिष्ठ व उपअभियंत्यांना रस्त्याच्या कामावर लक्ष ठेवून दर दोन दिवसांनी अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत. इतके करूनही रस्ता खराब झाल्यास किंवा नागरिकांची तक्रार आल्यास खराब रस्त्यांसाठी संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. नव्याने होणाऱ्या रस्त्याच्या दर्जाबाबत शंका असल्यास नागरिकांनी तक्रारीसाठी पुढे यावे. - नेत्रदीप सरनोबत (शहर अभियंता)