शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

कोविड खरेदीची जबाबदारी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व आरोग्य अधिकारी यांचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 10:44 IST

corona virus Collcator Kolhapur-कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी साहित्य खरेदीची जबाबदारी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्यात आली होती. या प्रक्रियेत जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तांत्रिक समितीचा कोणताही सहभाग नाही, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी  स्पष्ट केले.

ठळक मुद्देकोविड खरेदीची जबाबदारी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व आरोग्य अधिकारी यांचीच जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण : खरेदीशी जिल्हाधिकारी कार्यालयाचा संबंध नाही

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी साहित्य खरेदीची जबाबदारी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्यात आली होती. या प्रक्रियेत जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तांत्रिक समितीचा कोणताही सहभाग नाही, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी  स्पष्ट केले.कोविड साहित्य खरेदीत विविध विभागांनी केलेल्या खर्चाचे लेखापरीक्षण व प्रशासकीय तपासणी करण्यात येईल व त्यात दोषी आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची ग्वाहीही जिल्हाधिकारी देसाई यांनी दिली आहे..गेल्या दोन दिवसात कोरोना साहित्य खरेदीतील गैरव्यवहाराच्या बातम्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्या आहेत. याबाबत वारंवार जिल्हा प्रशासनाकडे विचारणा होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:हूनच याबाबत चारपानी लेखी स्पष्टीकरण देऊन कोरोना काळात साहित्य खरेदीची जबाबदारी, त्याचा व्यवहार, त्यासाठी पुरवण्यात आलेला निधी याबाबतच्या बाबी स्वच्छपणे उघड केल्या आहेत.कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी सर्व विभागांचे अधिकार व कर्मचारी यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, खासगी रुग्णालये, कोविड केअर सेंटर्स, अलगीकरण केंद्रे येथे विविध सुविधा देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मोठ्या प्रमाणात लागणारे साहित्य, औषधे, उपकरणे, तपासणी कीट पुरवण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत राबवण्यात आली. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा नियोजन समिती, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मागणीनुसार देण्यात आला. पुरवठादार निश्चित करणे, देयके अदा करणे यात जिल्हाधिकारी कार्यालय व तांत्रिक समितीचा कोणताही सहभाग नाही.

समिती सादर प्रस्तावांवर फक्त तांत्रिक तपशिलास मान्यता देण्याचे काम करते. त्यानंतर परस्पर खरेदी प्रक्रिया राबवली जाते. याबाबत झालेल्या तक्रारींची दखल घेऊन खर्चाचे लेखापरीक्षण व प्रशासकीय तपासणी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर