शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे पेलू

By admin | Updated: November 13, 2014 23:41 IST

शशिकांत शिंदे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य पक्षप्रतोदपदी निवड

सातारा : ‘आजपर्यंत मी पक्षासाठी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व अजित पवार यांनी विधानसभेतील पक्षप्रतोदपदी निवड केली असून, दिलेली जबाबदारी सक्षमपणे पेलून पक्षाची भूमिका या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविणार आहे,’ अशी ग्वाही आमदार शशिकांत शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.१९९९ मध्ये आमदार शिंदे यांनी जावळी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत प्रवेश केला. जावळीमध्ये सलग दहा वर्षे आमदार राहिल्यानंतर २००९ मध्ये त्यांनी माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवून मताधिक्याने विजय खेचून आणला. कामकाजाचा अनुभव, पक्षाच्या ध्येयधोरणाची बाजू मांडण्यासाठी प्रभावी वक्तृत्व, आक्रमकपणा या गुणांमुळे त्यांनी पक्षप्रतोदपद यापूर्वी सांभाळले आहे. यानंतर २०१३ मध्ये त्यांची राज्याच्या जलसंपदामंत्री निवड झाली. २०१४ मध्ये पुन्हा त्यांनी ४७ हजार ९६६ मतांनी विजय मिळविला.राष्ट्रवादीने विधानसभेत भाजप सरकाला पाठिंबा दर्शविला तरी विधानसभेत राष्ट्रवादीची भूमिका अजित पवार ठरवणार आहेत. राष्ट्रवादीची भूमिका माध्यमांसह जनतेसमोर मांडण्यासाठी आमदार शिंदे यांची पक्षाने केलेली नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षनेतेपदी अजित पवार, गटनेतेपदी आर. आर. पाटील, उपनेतेपदी जयदत्त क्षीरसागर, मुख्य पक्षप्रतोदपदी शशिकांत शिंदे व प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीचे पत्र पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना दिले आहे. (प्रतिनिधी)