कागलमध्ये मूर्तिदान उपक्रमास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:28 IST2021-09-15T04:28:09+5:302021-09-15T04:28:09+5:30

कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३९२ सार्वजनिक मंडळांपैकी १८० मंडळांनी आज आपल्या मूर्तीचे विसर्जन वाजत-गाजत जल्लोषात केले. दूधगंगा नदीवर ...

Response to the sculptural initiative in Kagal | कागलमध्ये मूर्तिदान उपक्रमास प्रतिसाद

कागलमध्ये मूर्तिदान उपक्रमास प्रतिसाद

कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३९२ सार्वजनिक मंडळांपैकी १८० मंडळांनी आज आपल्या मूर्तीचे विसर्जन वाजत-गाजत जल्लोषात केले. दूधगंगा नदीवर दरवर्षीप्रमाणे मूर्तिदान उपक्रम राबविण्यात आला. शहरात दहा प्रभागात मूर्ती विसर्जनाची सोय केली होती. नगरपालिकेचे सर्व विभाग प्रमुख, आरोग्य आणि अग्निशमन कर्मचारी यांनी यासाठी योगदान दिले. लोकप्रतिनिधीचींही मदत झाल्याने ऐंशी टक्के मूर्तिदान झाल्या. पोलीस निरीक्षक संजय गोरले यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या.

येथील शाहू सहकारी साखर कारखान्याच्या गणेशमूर्तीचे विसर्जन नगरपालिकेच्या वतीने तु.बा. नाईक प्रशालेत उभारलेल्या मूर्तिदान केंद्रांवर मूर्तिदान करून करण्यात आले. यावेळी कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Response to the sculptural initiative in Kagal