डीकेटीईमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिरास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:26 IST2021-09-22T04:26:37+5:302021-09-22T04:26:37+5:30

इचलकरंजी : नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, गावभागच्यावतीने डीकेटीई राजवाडा येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये ४००हून ...

Response to corona preventive vaccination camp in DKTE | डीकेटीईमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिरास प्रतिसाद

डीकेटीईमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिरास प्रतिसाद

इचलकरंजी : नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, गावभागच्यावतीने डीकेटीई राजवाडा येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये ४००हून अधिक विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला.

कोविडच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक कामासाठी लसीविना विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, या हेतूने १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे व संस्थेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आवाडे यांनी केले. मेडिकल ऑफिसर डॉ. सॅमसंग घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या लसीकरण उपक्रमासाठी कोविशिल्डचे डोस उपलब्ध करून देण्यात आले. यामध्ये विद्यार्थी, शिक्षकांबरोबर परिसरातील नागरिकही लाभ घेत आहेत. यावेळी मानद सचिव सपना आवाडे, एस. डी. पाटील, डॉ. पी. व्ही. कडोले, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, प्रा. डॉ. यु. जे. पाटील, प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रा. ए. व्ही. शहा व प्रा. ए. आर. बलवान यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Response to corona preventive vaccination camp in DKTE