मुरगूडमध्ये रक्तदान शिबिराला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:23 IST2021-04-22T04:23:06+5:302021-04-22T04:23:06+5:30

डी. डी. चौगले, बिद्रीचे संचालक प्रवीण भोसले, दिग्विजय पाटील, जीवन शिंदे, विकास पाटील, रणजित सूर्यवंशी, आर .व्ही. पाटील आदींच्या ...

Response to blood donation camp in Murgud | मुरगूडमध्ये रक्तदान शिबिराला प्रतिसाद

मुरगूडमध्ये रक्तदान शिबिराला प्रतिसाद

डी. डी. चौगले, बिद्रीचे संचालक प्रवीण भोसले, दिग्विजय पाटील, जीवन शिंदे, विकास पाटील, रणजित सूर्यवंशी, आर .व्ही. पाटील आदींच्या हस्ते रक्तदान शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी मुरगूड शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष रणजित सूर्यवंशी यांनी स्वागत केले, तर विकास पाटील-कुरुकलीकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शहरातील काही महिलांनी रक्तदान केले. येथील ग्रामीण रुग्णालयात हे शिबिर पार पडले. दुपारपर्यत १९८ जणांनी रक्तदान केले होते.

यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश चौगले, राजू आमते, नामदेव भांदीगरे, राजू सावंत, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष नीलेश शिंदे, रवी परीट, सुनील चौगले, महतेश पाटील, रणजित मगदूम, अमित तोरसे, पांडुरंग साळोखे, सर्जेराव कानडे, विठ्ठल जाधव, अमर देवळे, विकी बोरगावे, मयूर आवळेकर आदी प्रमुख उपस्थित होते.

२१मुरगुड

फोटो ओळ :- मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त मुरगूड (ता कागल) येथे आयोजित रक्तदान शिबिरात महिलांनीही रक्तदान केले. रक्तदान शिबिराचा प्रारंभ करताना मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Response to blood donation camp in Murgud