शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसन प्रश्न समन्वातून सोडवा, मंत्री मुश्रीफ यांची महापालिका व फेरीवाल्यांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 17:54 IST

Hasan Mushrif Muncipal Corporation Kolhapur- कोणाचे नुकसान होणार नाही आणि कोणाला अडथळाही होणार नाही अशा पद्धतीने संयुक्तपणे पाहणी करून फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवावा, तसेच फेरीवाला धोरण कशा पद्धतीने राबवायचे यासंबंधी प्रशासक व फेरीवाला कृती समितीने समन्वयातून मार्ग काढावा, अशी सूचना सोमवारी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या मनपा अधिकारी आणि फेरीवाला कृती समिती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

ठळक मुद्देपुनर्वसन प्रश्न समन्वातून सोडवामंत्री मुश्रीफ यांची महापालिका व फेरीवाल्यांना सूचना

कोल्हापूर : कोणाचे नुकसान होणार नाही आणि कोणाला अडथळाही होणार नाही अशा पद्धतीने संयुक्तपणे पाहणी करून फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवावा, तसेच फेरीवाला धोरण कशा पद्धतीने राबवायचे यासंबंधी प्रशासक व फेरीवाला कृती समितीने समन्वयातून मार्ग काढावा, अशी सूचना सोमवारी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या मनपा अधिकारी आणि फेरीवाला कृती समिती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.गेल्या आठ दिवसांपासून शहरात फेरीवाले विरुद्ध महापालिका प्रशासन असा संघर्ष निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीत फेरीवाले कृती समितीचे पदाधिकारी पालिकेच्या कारवाईवरून संतप्त झाले होते. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी झालेली नाही, फेरीवाल्यांनी कोठे बसायचे, फेरीवाला झोन कोणते हेच ठरले नाही तर मग कारवाई कसली करता? असा सवाल आर. के. पोवार यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना विचारला.दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर ग्राम विकास मंत्री मुश्रीफ यांनी आर. के. पोवार यांच्यासमवेत ताराबाई रोड व महाद्वाररोडवर जाऊन संयुक्त पाहणी करा, पट्टे मारून घ्या. समन्वयातून मार्ग काढा असे सांगितले. बैठकीस आमदार चंद्रकांत जाधव, दिलीप पवार, महंमद शरिफ शेख, रघुनाथ कांबळे, अशोक भंडारे, राजू जाधव, किशोर घाडगे उपस्थित होते. 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका