शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षेच्या शंकांचे शुक्रवारी होणार निरसन

By admin | Updated: May 27, 2015 00:57 IST

व्याख्यान : ‘लोकमत युवा नेक्स्ट’तर्फे आयोजन

कोल्हापूर : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा, करिअरची संधी कुठे आहे, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात घोळत असतात. या प्रश्नांची योग्य उत्तरे कुठे मिळतात? प्रत्येकजण वेगवेगळे सांगत असतो; त्यामुळे मनात अनेक शंकांचे कल्लोळ माजलेले असतात. याच शंकांचे योग्य निरसन करण्यासाठी ‘लोकमत युवा नेक्स्ट’ व पुणे येथील ‘द युनिक अकॅडमी’तर्फे शुक्रवारी (दि. २९) ‘स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी व करिअरची संधी’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे सकाळी अकरा वाजता हे व्याख्यान होणार आहे. व्याख्यानात ‘द युनिक अकॅडमी’चे प्रशिक्षक प्रा. हर्षल लवंगारे मार्गदर्शन करणार आहेत. लवंगरे हे यूपीएससी व एमपीएससी परीक्षेच्या अभ्यास कसा करावा, कोणती पुस्तके वाचावीत, स्पर्धा परीक्षेमधील करिअरची विविध संधी याबाबत सविस्तर माहिती देणार आहेत. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत व खुला आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी येथील ‘लोकमत’च्या शहर कार्यालयात उपलब्ध आहेत. तरी इच्छुकांनी उद्या, गुरुवारपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी पाचपर्यंत प्रवेशिका घेऊन जाव्यात. ( प्रतिनिधी )