शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

उष्णजल प्रक्रियेचा अहवाल रखडला

By admin | Updated: May 12, 2015 23:42 IST

हापूसची परदेशवारी : यंदा वाशी मार्केटचा आधार...

रत्नागिरी : आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी उष्णजल प्रक्रियेबाबत अद्याप संशोधन सुरूच आहे. फळमाशीचे कारण देत युरोपिय देशांनी गतवर्षी आंबा निर्यातीवर बंदी घातली होती. यावर्षी उष्णजल प्रक्रियेची अट घालून निर्यातीवरील बंदी उठविण्यात आली. मात्र, अद्याप उष्णजल संशोधन पूर्ण न झाल्यामुळे बाष्पजल प्रकिया करून आंबा निर्यात सुरू आहे.आंबा हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. शिवाय राष्ट्रीय फळ म्हणून त्यास प्रसिध्दी मिळाली आहे. फळाची गोडी, चव, स्वाद, रंग, आकार आदी गुणवैशिष्ट्यांमुळे कोकणातील आंब्याची हापूस जात जगामध्ये सरस ठरली आहे. स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ही जात लोकप्रिय आहे. आंब्यावर एक तास ४८ अंश सेल्सिअस उष्णजल प्रक्रिया केल्यास फळमाशीच्या अळ्या मरून जातात, असे मत संशोधकांनी वर्तविले होते. बैगनपल्ली, बदामी, तोतापुरी, केशरसारख्या जातीच्या आंब्याची साल जाड असल्याने या आंब्यासाठी संबंधित प्रक्रिया योग्य आहे. मात्र, हापूस आंब्याची साल पातळ असल्याने संबंधित प्रक्रियेमुळे हापूसच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पणन मंडळामध्ये संशोधन सुरू करण्यात आले आहे. एप्रिलअखेरीस फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. परंतु मार्चपासून संशोधन सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी पेरू आणून, सडविण्यात आले आहेत. फळमाशी अंडकोषातून बाहेर पडली असली तरी झाडावरील आंब्यावर त्याचा प्रादुर्भाव झालेला नाही. संशोधन अद्याप अपूर्ण असल्यामुळे आंब्यासाठी बाष्पजल प्रक्रिया वापरण्यात येत आहे.युरोपीय देशांनी यावर्षी काही अटी ठेवत निर्यातीवरील बंदी उठवली. निर्यातीसाठी उष्णजल प्रक्रियेला सुरूवातीला मान्यता देण्यात आली होती. मात्र, संशोधन पूर्ण होऊ शकलेले नसल्याने बाष्पजल प्रक्रियेला मान्यता देण्यात आली. वाशी येथे बाष्पजल प्रक्रिया युनिट आहे. वाशीतून युरोपला आंबा पाठवताना बाष्पजल प्रक्रिया करून पाठवली जात आहे. बाष्पजल प्रक्रियेमध्ये साडेसत्तेचाळीस अंश सेल्सिअस इतके तापमान आंब्यास दिले जाते. नंतर थंड पाण्याव्दारे हळूहळू तापमान खाली आणले जाते. त्यामुळे फळमाशीच्या अळ्या मरून जातात. वाशी मार्केटमधील आंब्यावर उष्णजल प्रक्रिया करून आंबा युरोपीय देशात पाठवण्यात येत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गतूनही युरोपला आंबा पाठवताना वाशी मार्केटमधून उष्णजल प्रक्रिया केली जाते. मॉरिशस, न्युझीलंड, युरोप, अमेरिका, जपान आदी देशातून आंब्याला मागणी होत आहे. अवकाळीमुळे जिल्ह्यातील २० हजार ५१८.३० हेक्टर क्षेत्रावरील आंबापीक नष्ट झाले. शिवाय अद्याप अधूनमधून पडत असलेल्या वादळी पावसामुळेही आंबा पिकावर परिणाम होत आहे. निर्यातीला मागणी असूनही त्या प्रमाणात पुरवठा होत नाही. उष्णजल प्रक्रिया अहवाल लांबल्याने बाष्पजल प्रक्रिया ग्राह्य धरली जात आहे. आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्यात आला आहे. २५ मेपर्यंत आंबा हंगाम चालेल, असा अंदाज शेतकरी वर्तवित आहेत. हंगाम संपला तरी उष्णजल प्रक्रिया अहवालास प्रतीक्षा करावी लागली आहे. जूनपर्यंत संशोधन पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णजलचा अहवाल आता पुढील वर्षीच्या हंगामासाठी उपयुक्त ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)आता पुढील वर्षी...फळमाशीचे कारण देत मागील वर्षी युरोपीयन देशांनी हापूस नाकारला होता. त्यावर उष्णजल प्रक्रियेचा पर्याय पुढे आला. मात्र, ज्याठिकाणी आंबा पिकतो, त्याठिकाणी अद्याप ही सुविधा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे मुंबईतील वाशी मार्केटमधून बाष्पजल प्रक्रिया पूर्ण करून यंदा हापूस युरोपीय देशात पाठवण्यात येत आहे. रत्नागिरीत ही सुविधा होणार कधी ?आता पुढील वर्षी...जूनपर्यंत संशोधन पूर्ण होण्याची शक्यता.उष्णजलचा अहवाल आता पुढील वर्षीच्या हंगामासाठी उपयुक्त ठरणार.वाशी मार्केटमधील आंब्यावर उष्णजल प्रक्रिया करून आंबा युरोपीय देशात पाठवण्यात येतो.रत्नागिरी, सिंधुदुर्गतूनही युरोपला आंबा पाठवताना वाशी मार्केटमधून केली जातेय उष्णजल प्रक्रिया.