शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदानातून जपली माणुसकीची नाती

By admin | Updated: July 3, 2016 00:54 IST

‘लोकमत’च्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद : जवाहरलालजी दर्डा यांच्या ९३ व्या जयंतीचे औचित्य

कोल्हापूर : समाजात घडणाऱ्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवितानाच सामाजिक बांधीलकीचे व्रत जपलेल्या ‘लोकमत’ व ‘युवा आॅर्गनायझेशन’तर्फे शनिवारी आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदानासारख्या श्रेष्ठ दानाच्या माध्यमातून जणू माणुसकीच्या नात्याचा धागा जोडण्यात आला. दिवसभरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह युवक, शिक्षक, महिला, वृत्तपत्र विक्रेते, नागरिक व ‘लोकमत’मधील कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्रामसेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ९३ व्या जयंतीचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ‘अर्पण ब्लड बँक’ यांचे सहकार्य लाभले. राधाकृष्ण मंदिर हॉल येथे झालेल्या या शिबिराचे उद्घाटन ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख व संपादक वसंत भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी डॉ. प्रकाश गाडवे, हिंदू धर्म मंडळ संस्थेचे दिलीप कोडोलीकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते. पहिल्यांदाच रक्तदान करणारे राधेश्याम सारडा यांच्यापासून शिबिरास सुरुवात झाली. त्यानंतर ‘लोकमत सखी मंच’च्या सदस्या प्राजक्ता पडगे यांनी रक्तदान केले. त्यांनी यापूर्वी बारा वेळा रक्तदान केले आहे. शिबिरास अर्पण ब्लड बॅँकेचे अर्जुन शेळके, नीलम मोहिते, नम्रता मगदूम, राजश्री लांबोरे, राहुल जाधव यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी) पोलिस दलातर्फेही प्रतिसाद : ‘लोकमत’ व ‘युवा आॅर्गनायझेशन’तर्फे शनिवारी आयोजित रक्तदान शिबिरात सहायक पोलिस निरीक्षक आर. पी. भूतकर, एस. यू. खरात, एम. पी. रेपे, ए. जे. नाईक, आर. बी. यादव, डी. ए. पाटील, एस. पी. सवजेकर, ए. पी. छत्रे, एस. एम. संकपाळ, केशव राठोड यांनी रक्तदान केले. यावेळी शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, ‘शाहूपुरी’चे निरीक्षक प्रवीण चौगले उपस्थित होते. मोलाचे सहकार्य या शिबिरास शाहुपूरी तिसऱ्या गल्लीतील हिंदू धर्म मंडळ संस्थेचे सहकार्य लाभले. ७५ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या संस्थेने आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. संस्थेतर्फे दरवर्षी प्राणायाम, योग यांसह अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते. ६९ वे रक्तदान मलिक मेहंदी गोवावाला यांनी १९९४ पासून रक्तदान संकल्पास सुरुवात केली. या शिबिरात त्यांनी ६९ व्या वेळी रक्तदान केले. रक्तदानाविषयी समाजात असलेले गैरसमज दूर व्हावेत व लोकांना त्याचे महत्त्व पटावे यासाठी ते प्रबोधनाचे कामही करतात. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान व देहदानाचा संकल्पही केला आहे. योगायोग : माधव भिलवडीकर वयाच्या अठराव्या वर्षापासून रक्तदान करतात. या शिबिरात त्यांनी ४८ व्या वेळी रक्तदान केले. पेशाने नृत्यप्रशिक्षक असलेले भिलवडीकर यांनी नागपुरात पहिल्यांदा कोल्हापूरच्या एका गरजू रुग्णासाठी रक्तदान केले होते. कामानिमित्त कोल्हापूरला आले असताना पुन्हा कोल्हापूरमध्येच त्यांनी रक्तदान केले, हा एक योगायोगच असल्याचे त्यांनी सांगितले. वृत्तपत्र विक्रते ५३ वर्षीय हेमंत वेद यांनी शिबिरात साठाव्यांदा रक्तदान करून ‘लोकमत’च्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.