शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसन घरकुलांचा निधी अन्यत्र वळविणार

By admin | Updated: March 12, 2015 00:10 IST

जयभीमनगर, नेहरूनगरमधील लाभार्थी : झोपडपट्टी पुनर्वसनाचे लाभार्थी घरकुलांपासून वंचित होण्याची भीती

इचलकरंजी : शहरातील झोपडपट्टी पुनर्वसनामधील जयभीम व नेहरूनगर याठिकाणी घरकुलांच्या इमारतींचे बांधकाम सुरू असतानाच तेथील ७०९ लाभार्थ्यांमध्ये वंचित होण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी त्याठिकाणचा निधी जाधव मळा, भोरे वसाहत, लालनगर व शहापूर पूरग्रस्त वसाहतीमधील घरकुले बांधण्यासाठी वळविण्यात येणार आहे.शहर झोपडपट्टीमुक्तीसाठी सुमारे दहा वर्षांपूर्वीपासून तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे व सत्तारूढ कॉँग्रेसने झोपडपट्टी वसाहतींचे सर्वेक्षण केले. त्यापैकी नेहरूनगर, जयभीम व रेणुका या तीन झोपडपट्टी वसाहतींचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावाला केंद्र सरकारच्या एकात्मिक झोपडपट्टी निर्मूलन योजनेंतर्गत मंजुरी घेण्यात आली. जयभीम झोपडपट्टीतील ७२० व नेहरूनगरमधील ६३६ झोपडपट्टींचा प्रस्ताव मंजूर झाला. तर रेणुका झोपडपट्टीचे जाग्याचे आरक्षण बदलण्यासाठी तो प्रलंबित राहिला.झोपडपट्टी पुनर्वसनाच्या घरकुल इमारती बांधण्यासाठी ३१ कोटी रुपयांचा प्रस्ताव सरकारने मंजूर केला असून, त्याचा पावणेचार कोटी रुपयांचा पहिला हप्ता पालिकेला प्राप्त झाला आहे. तर ४.०८ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता नुकताच नगरपालिकेला दिला आहे. सध्या जयभीमनगरमध्ये ११ इमारती पूर्ण अवस्थेत असून, त्यामध्ये ४४४ लाभार्थ्यांच्या घरकुलांची सोय आहे. त्याठिकाणी अद्याप १८६ लाभार्थी शिल्लक आहेत. नेहरूनगर येथे ४८ लाभार्थ्यांची घरकुल असलेली एक इमारत पूर्ण अवस्थेच्या अंतिम टप्प्यात आहे. त्याठिकाणी आणखीन ७५ लाभार्थ्यांनी आपली जागा रिकामी करून दिली आहे. त्यांच्यासाठीही तेथे इमारत लवकरच बांधली जाईल; पण त्याठिकाणी असलेल्या उर्वरित ५२३ लाभार्थ्यांनी आपल्या जागा रिकाम्या करून दिलेल्या नाहीत. त्यामुळे तेथे या लाभार्थ्यांसाठी घरकुलांच्या इमारतींची बांधणी होणे सध्या तरी अशक्य वाटत आहे. त्यामुळे या ५२३ लाभार्थ्यांची घरकुलांविना मोठी पंचाईत होणार आहे. जयभीमनगरातील १८६ व नेहरूनगरमधील ५२३ अशा ७०९ लाभार्थ्यांच्या घरकुलांसाठी मंजूर असलेला निधी रद्द होऊ नये म्हणून त्यांच्याऐवजी भोरे वसाहतीमधील ४८, जाधव मळा येथे १३२, शहापूर पूरग्रस्त वसाहतीमध्ये ३६ व लालनगरमधील लाभार्थ्यांना घरकुलांच्या इमारतीसाठी हा निधी वर्ग करण्याचा प्रस्ताव पालिका तयार करीत आहे. (प्रतिनिधी)१४.५ कोटी रुपयांचा फेरप्रस्तावझोपडपट्टी पुनर्वसनाच्या घरकुलांच्या इमारतीचे बांधकाम गेली दोन वर्षे रेंगाळले आहे. तर बांधकाम क्षेत्रातील सिमेंट व वाळूचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसनांतर्गत इचलकरंजीत सुरू असलेल्या इमारतींच्या बांधकामासाठी आणखीन १४.५ कोटी रुपयांचा फेरप्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाबाबत ७ मार्चला गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्याशी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे, मुख्याधिकारी सुनील पवार, बांधकाम सभापती भाऊसाहेब आवळे, जलअभियंता बापूसाहेब चौधरी, आदींनी चर्चा केली. त्यावेळी मंत्री मेहता यांनी प्रस्तावाचा शासनाकडून सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले.