प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:44 IST2021-03-04T04:44:32+5:302021-03-04T04:44:32+5:30

उत्तूर : आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकातून ...

Rehabilitation of project affected people will not be possible without completion | प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

उत्तूर : आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे. आंबेओहळ प्रकल्पाच्या कामासाठी २० वर्षांपेक्षा जादा काळ झालेला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी अनेक बैठका घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न मी स्वत: केलेला आहे. लाभक्षेत्रामध्ये जमिनी मिळण्यामध्ये अडचणी झाल्यानंतर प्रतिहेक्टरला ३६ लाख रुपये या दराने २५८ हेक्टरसाठी एकूण ९३ कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज मंजूर झाले आहे. त्यापैकी १२९ हेक्टरसाठी २५८ जणांना ४६ कोटी ४४ लाख रुपये पॅकेजचे वाटप झाले आहे. १०६ हेक्टर जमिनीचे वाटप होऊन त्यामध्ये ९६ जणांना पूर्णत: जमीन वाटप व ३२ जणांना अंशत: जमीन वाटप झाले आहे. संकलन दुरुस्ती, कुटुंबाची व्याख्या, चार एकरांपेक्षा जादा जमिनी देण्याबाबत अडचणी व इतर सर्व प्रश्नांचा निपटारा येत्या १५ दिवसांत करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

येत्या १५ मार्च रोजी जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांबरोबर प्रश्ननिहाय बैठक घेण्याचे ठरले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी कोणतीही चिंता करू नये, असे आवाहनही मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे.

Web Title: Rehabilitation of project affected people will not be possible without completion