शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगले उपनिबंधक कार्यालयात एजंटांचा राबता

By admin | Updated: November 27, 2015 01:15 IST

संस्था अवसायनात : बोगस लेखापरीक्षणाद्वारे बँक खात्यावर व्यवहार दाखविण्याचा प्रयत्न

दत्त बिडकर -- हातकणंगले  उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडून १५४२ संस्था अवसायनात काढण्याची प्रक्रिया सुरू केली असल्यामुळे संस्थाप्रमुखाकडून बोगस लेखापरीक्षण तयार करून बँक खात्यावर व्यवहार दाखवण्यासाठी मांडवली केली जात आहे. उपनिबंधक कार्यालयात संस्था वाचवण्यासाठी बोली सुरू झाली आहे. यामुळे सात-आठ महिने बंद झालेला एजंटांचा राबता नव्याने सुरू झाला आहे. नव्याने संस्था नोंदणीकृत करण्याच्या जाचक अटी, वेळ व पैसा खर्च करण्यापेक्षा जुन्या संस्था वाचवण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.तालुक्यातील पत्ता सापडत नसलेल्या १५४२ संस्थांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई उपनिबंधक कार्यालयाकडून सुरू आहे. दरम्यान, अवसायनात काढलेल्या संस्थांना शेवटची संधी म्हणून ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत आपली बाजू मांडण्याची संधी दिली आहे. ज्या संस्था या तारखेपर्यंत आपले म्हणणे मांडणार नाहीत, त्यांना एक महिन्याची मुदत देऊन त्यांची नोंदणी रद्द होणार आहे.नोंदणी रद्द होवू नये म्हणून काही संस्थाप्रमुख गत पाच-दहा वर्षांचे लेखापरीक्षण करून घेत आहेत. संस्थेच्या बँक खात्यावर व्यवहार दाखवण्यासाठी मांडवली सुरू केली आहे. नव्याने संस्था नोंदणीकृत करण्याच्या जाचक अटी आणि लागणारी कागदपत्रे, सभासद संख्या, बँक दाखला, विविध विभागांचे दाखले. वेळ आणि पैसा खर्च करण्यापेक्षा जुन्या संस्था वाचवण्यासाठी संस्थाप्रमुख धडपडत आहेत. या संस्था वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन लागेल तो खर्च करण्याची तयारी करत आहेत.सहकार खात्याने ९७ वी घटना दुरुस्ती २०१३ मध्ये लागू केली. यावेळी बहुतेक संस्थांनी विशेष सभा घेऊन ९७ वी घटना दुरुस्ती करून आपले ठराव आणि वार्षिक माहिती उपनिबंधक कार्यालयाकडे सादर केली. २०१३ पासून नोव्हेंबर २०१५ पर्यंत सहकार खात्याने काय केले असा सवाल उपस्थित होत असून सहकार विभागाने आताच संस्था अवसायनात घेण्यासाठी प्रक्रिया का सुरू केली यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.