शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

आष्टा पालिकेने उत्पन्न वाढीवर भर द्यावा

By admin | Updated: June 1, 2015 00:21 IST

शेखर गायकवाड : शहरातील विविध विकासकामांची पाहणी

आष्टा : आष्टा पालिकेने नावीन्यपूर्ण योजना राबवाव्यात, तसेच पालिकेने स्वत:चे उत्पन्न वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयन करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केले.आष्टा शहरातील विविध विकास कामांची पाहणी जिल्हाधिकारी गायकवाड यांनी केली. यावेळी नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे यांनी स्वागत केले. तहसीलदार रुपाली सरनोबत, मुख्याधिकारी पंकज पाटील, उपनगराध्यक्षा संगीता वारे, झुंझारराव पाटील, विशाल शिंदे, शैलेश सावंत, प्रभाकर जाधव, प्रकाश मिरजकर, आब्बास लतीफ, के. टी. वग्याणी, मयूर धनवडे, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. माजी आमदार शिंदे म्हणाले, आष्टा पालिकेने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबवित शहराचा विकास साधला आहे. २००४ मध्ये स्वच्छता अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. वर्षाखेर सर्व रस्ते, गटारींसह, तीर्थक्षेत्र विकास योजनेतून सुरू असलेली ७ लिंगांची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. आष्टा शहर शौचालययुक्त करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी गायकवाड यांनी अष्टलिंग तीर्थक्षेत्रांपैकी मारुती मंदिरातील रामलिंगाचे दर्शन घेतले. मंदिराबाहेर बसविण्यात आलेल्या सौरदिव्याची माहिती घेतली. आष्टा शहराच्या चावडीलाही भेट दिली. या चावडीची इमारत पाडून नवीन इमारत बांधकामाचा प्रस्ताव तातडीने देण्यास त्यांनी सांगितले.२ कोटी खर्चून बांधलेल्या काकासाहेब भाजी मंडई, फिश मार्केट, कोलाटी समाज घरकुल योजना, तसेच विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉलची पाहणी केली. आष्टा पालिकेने विविध योजनेतून शहरात राबविलेल्या विकास कामांची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. झुंझाराव पाटील यांनी आभार मानले.यावेळी सौ. जमिलाबी लतीफ, मंडल अधिकारी पी. बी. उरकुटे, तलाठी प्रभाकर जाधव, दिनकर बसुगडे, तानाजी सूर्यवंशी, पद्मश्री मालगावे, नीता काळोखे, आर. एन. कांबळे, पोपट हाबळे, आर. बी. पवार, सुधीर कांबळे, राहुल हिरूगडे उपस्थित होते. (वार्ताहर)विजेचा अडथळाआष्टा पालिकेचा घनकचरा प्रकल्प आदर्शवत आहे. येथे कचऱ्यापासून खत निर्मिती होते. मात्र वीज नसल्याने हा प्रकल्प जिल्हाधिकाऱ्यांना पाहता आला नाही.