देशाची गरज ओळखून सैनिकांप्रमाणे कार्यरत रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:56 IST2021-02-05T06:56:21+5:302021-02-05T06:56:21+5:30

कोल्हापूर : प्रत्येकाला सैन्यदलात भरती होणे शक्य नाही. पण, देशाची गरज ओळखून त्या-त्या क्षेत्रात जिगरबाज सैनिकांप्रमाणे कार्यरत रहा, ...

Recognize the needs of the country and work like soldiers | देशाची गरज ओळखून सैनिकांप्रमाणे कार्यरत रहा

देशाची गरज ओळखून सैनिकांप्रमाणे कार्यरत रहा

कोल्हापूर : प्रत्येकाला सैन्यदलात भरती होणे शक्य नाही. पण, देशाची गरज ओळखून त्या-त्या क्षेत्रात जिगरबाज सैनिकांप्रमाणे कार्यरत रहा, असे आवाहन कर्नल अमरसिंह सावंत यांनी रविवारी येथे केले.

येथील वुई फॉर सोल्जर्स फाउंडेशनच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनच्या सभागृहातील या कार्यक्रमास कर्नल आर. डी. शिंदे, कर्नल विलास सुळकुडे, उद्योगपती नितीन वाडीकर, अमोल कोरगावकर प्रमुख उपस्थित होते. देश रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना पाठबळ देण्याचा ‘वुई फॉर सोल्जर्स’चा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. देशाचे भवितव्य घडविण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान द्यावे, असे आवाहन कर्नल सावंत यांनी केले. आपले सैन्यदल मजबूत असून नागरिकांना घाबरण्याची गरज नाही. आपले पाठबळ सैनिकांची ताकद वाढविण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने समाज पुढे येत असून ते अभिमानास्पद असल्याचे कर्नल शिंदे यांनी सांगितले. सत्कर्म, पुण्यकर्म करा. त्याची ‘एफडी’ आयुष्यात उपयुक्त ठरेल, असे कर्नल सुळकुडे यांनी सांगितले. त्यांनी सैनिकांसाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

या कार्यक्रमात घुणकी (ता. हातकणंगले) येथील जवान उमेश चव्हाण यांच्या कुटुंबीयांसाठीच्या आर्थिक मदतीचा धनादेश त्यांचे भाऊ प्रफुल्ल यांच्याकडे कर्नल सावंत यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला. कर्नल सावंत यांनी ११ हजारांची देणगी फाउंडेशनला दिली. यावेळी शिरीष कुंदे, अशोक रोकडे, शिवराज पाटील, मुकुंद कुलकर्णी, अनिल नागराळे, विनायक बर्वे, गजानन शिरोडकर, राजन शिंदे, आदी उपस्थित होते. फाउंडेशनचे उपाध्यक्ष दीपक गाडवे यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष डॉ. प्रकाश ओसवाल यांनी आभार मानले. अस्मिता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो (२४०१२०२१-कोल-सोल्जर्स फाउंडेशन) : कोल्हापुरात रविवारी वुई फॉर सोल्जर्स फाउंडेशनच्यावतीने जवान उमेश चव्हाण यांचे भाऊ प्रफुल्ल यांना कर्नल अमरसिंह सावंत यांच्या हस्ते आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी मुकुंद कुलकर्णी, अनिल नागराळे, दीपक गाडवे, अमोल कोरगावकर, विलास सुळकुडे, आर. डी. शिंदे, नितीन वाडीकर, प्रकाश ओसवाल उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)

Web Title: Recognize the needs of the country and work like soldiers