शहरं
Join us  
Trending Stories
1
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
2
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
3
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
4
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
5
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
6
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
7
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
8
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
9
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
10
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
11
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
12
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
13
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
14
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
15
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
16
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
17
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
18
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
19
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
20
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपुरुषांच्या फलकाची विटंबना

By admin | Updated: January 16, 2015 00:25 IST

रांगोळीत रास्ता रोको : ग्रामपंचायत कार्यालयावर दगडफेक

हुपरी : रांगोळी (ता. हातकणंगले) येथील बसस्थानकानजीक उभारलेल्या राष्ट्रपुरुषांच्या फलकाची अज्ञात समाजकंटकाने विटंबना केल्यावरून ग्रामपंचायत कार्यालयावर दगडफेक, रास्ता रोको, आंदोलक व ग्रामस्थांत वादावादी, एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी, निषेध सभांमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय साळुंखे व लोकप्रतिनिधींनी परिस्थिती हाताळल्याने अनर्थ टळला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
भीमा कोरेगावमध्ये (१ जानेवारी १८१८) शौर्य दिनानिमित्त राष्ट्रपुरुषांचे छायाचित्र असणारा फलक रांगोळी गावातील बसस्थानकानजीक उभारला होता. अज्ञातांनी आठ दिवसांपूर्वी हा फलक काढला होता. त्यामुळे गावात तणाव निर्माण होण्याची शक्यता गृहित धरून ग्रामपंचायतीने त्याच ठिकाणी दुसरा फलक उभारला होता. हा फलकही समाजकंटकांनी काल, बुधवारी रात्री फाडून त्याची विटंबना केली. हे निदर्शनास येताच ग्रामपंचायतीने पहाटे तो फलक हटविला. ही माहिती समजताच संतप्त जमावाने ग्रामपंचायतीवर दगडफेक केली. रस्त्यावर टायरी पेटवून रास्ता रोको केला. परिणामी इचलकरंजी-हुपरी मार्गावरील वाहतूक बंद केली.
दरम्यान, पोलीस निरीक्षक संजय साळुंखे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी आले. त्यांनी त्वरित ग्रामस्थ व आंदोलकांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या समाजकंटकांना अटक करावी आणि उभारलेले सर्वच फलक हटवावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली. त्याला एका समाजाने आक्षेप घेतल्याने दोन्ही समाजात वादावादी झाली. यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांना शांत केले. त्यानंतर एका समाजाचा धार्मिक कार्यक्रम होईपर्यंत त्या समाजाचे फलक ठेवण्याचा निर्णय झाला. (वार्ताहर)