शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

लस घेतल्यानंतर ३८ जणांना रिॲक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:56 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसीची टोचणी सुरू असून, यामुळे ३८ जणांना रिॲक्शन आल्याचे सांगण्यात ...

कोल्हापूर : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसीची टोचणी सुरू असून, यामुळे ३८ जणांना रिॲक्शन आल्याचे सांगण्यात आले; परंतु या सर्वांची प्रकृती आता ठणठणीत असून, कोणीही घाबरण्याचे कारण नाही, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील ११ केंद्रांवर १६ जानेवारीपासून लसीकरण केले जात आहे. हे लसीकरण केवळ शासकीय आरोग्य सेवेमध्ये काम करणाऱ्यांना केले जात आहे; परंतु अजूनही या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून पूर्णपणे प्रतिसाद मिळालेला नाही. आता लसीकरणासाठी आणखी ९ केंद्रे वाढविण्यात आली आहेत.

२३ जानेवारी अखेरपर्यंत ५५०० जणांना ही लस देण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, त्यापैकी केवळ ३५०१ जणांनी लस टोचून घेतली आहे. त्यापैकी ३४ जणांना रिॲक्शन झाली आहे. यातील काही जणांना ताप आला, काहींचे डोके दुखायला सुरुवात झाली, तर काहींना मळमळायला लागले; परंतु हा त्रास काही तासांपुरताच असून, आता या सर्वांची तब्येत ठीक असल्याचे सांगण्यात आले.

सुरुवातीच्या काळातील ११ केंद्रांनंतर आता ग्रामीण भागात ८ आणि कोल्हापुरात १ केंद्र वाढविण्यात आले आहे. यामध्ये फिरंगाई नागरी आरोग्य केंद्राचा समावेश आहे. तर ग्रामीण भागात आजरा, चंदगड, भुदरगड, राधानगरी, मलकापूर ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय कोडोली, प्राथमिक आरोग्य केंद्र पुलाची शिरोली, जयसिंगपूर या नव्या आरोग्य संस्था वाढविण्यात आल्या आहेत.

या आठवड्यामध्ये उद्या बुधवार, गुरुवार, शुक्रवार या तीन दिवशी लसीकरण करण्यात येणार आहे. शनिवारीही लसीकरण करण्यात येणार होते. मात्र, ३१ जानेवारी रोजी पल्स पोलिओ मोहीम असल्यामुळे ३० तारखेचे लसीकरण होणार नाही. मात्र, त्यानंतरच्या शनिवारी लसीकरण सुरू ठेवण्यात येणार आहे.

चौकट

उद्दिष्टाच्या १३ टक्केच काम

कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही एकूण लसीकरणाच्या उद्दिष्टाच्या केवळ १२ टक्के काम झाले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील २२४१६, कोल्हापूर महापालिका आरोग्य विभागाकडील ११४६१, अशा एकूण ३३ हजार ८७७ आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ४५९८ जणांना सोमवारअखेर लस टोचण्यात आली आहे. १३.५७ टक्के लसीकरण आतापर्यंत झाले आहे.

कोट

लसीकरणाबाबत कुणीही मनामध्ये शंका घेऊ नये. आमच्यासारख्या ५०० हून अधिक वैद्यकीय अधिकऱ्यांनी आतापर्यंत लस घेतली आहे. अगदी कमी जणांना थोडा त्रास झाला आहे; परंतु तो काही तासांसाठी झाला आहे. आता या सर्वांची प्रकृती उत्तम आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोणत्याही शंकाकुशंका मनात न घेता लस टोचून घ्यावी.

डॉ. योगेश साळे

जिल्हा आरोग्य अधिकारी