चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर रवींद्र आपटे सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:08 IST2021-02-20T05:08:51+5:302021-02-20T05:08:51+5:30

कोल्हापूर : ‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे हे चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी सक्रिय झाले. संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात आयोजित शिवजयंती ...

Ravindra Apte active after four months of rest | चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर रवींद्र आपटे सक्रिय

चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर रवींद्र आपटे सक्रिय

कोल्हापूर : ‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे हे चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी सक्रिय झाले. संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात आयोजित शिवजयंती कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली. यावेळी संघाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी अध्यक्ष आपटे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार हे प्रत्येकाच्या वैयक्तिक, सार्वजनिक व राजकीय जीवनात मार्गदर्शक ठरले आहेत. त्यांच्या विचारानेच आमची वाटचाल सुरू आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ संचालक अरूण नरके, रणजितसिंह पाटील, विश्वास जाधव, दीपक पाटील, उदय पाटील, बाळासाहेब खाडे, अमरिश घाटगे, सत्यजीत पाटील, बाबा देसाई, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, बोर्ड सचिव एस. एम. पाटील, प्रशासन व्यवस्थापक डी. के. पाटील, जनसंपर्क अधिकारी पी. आर. पाटील, चेतन नरके, रघू पाटील आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : ‘गोकुळ’मध्ये शुक्रवारी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी रवींद्र आपटे, महादेवराव महाडिक, अरूण नरके आदी उपस्थित होते. (फोटो-१९०२२०२१-कोल-गोकुळ)

Web Title: Ravindra Apte active after four months of rest