शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळ्याच्या रेडेमहालमध्ये उंदीर, घुशींचा डेरा

By admin | Updated: September 1, 2015 22:49 IST

इमारतीतच धान्याचे दुकान : नगरपरिषदेसह, जनता बझार प्रशासनाकडून पूर्णपणे दुर्लक्ष

नितीन भगवान - पन्हाळा ऐतिहासिक इमारतीत स्वस्त धान्य दुकान थाटल्याने परिसर, दुकानात उंदीर-घुशींच्या सुळसुळाटाने ऐतिहासिक ‘रेडेमहाल इमारतीस’ धोका निर्माण झाला आहे. नगरपरिषदेच्या ताब्यात असलेली ही इमारत जनता बझार या सहकारी संस्थेला लोकांची सोय व्हावी या उद्देशाने रेशन धान्य दुकानासाठी ही जागा नाममात्र भाड्याने देण्यात आली. या जागेची संस्था योग्य देखभाल करीत नसल्याने नगरपरिषदेच्या लक्षात आल्यानंतर जागा रिकामी करण्यास सांगितले; पण जनता बझार सहकारी संस्थेने अन्य ठिकाणी जागा मिळत नसल्याचे कारण दाखवत ही बाब न्यायप्रविष्ठ केली. गेली २० वर्षे हा वाद सुरू आहे. या काळात नगरपरिषद जनता बझार प्रशासनाकडून इमारतीकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याने आता ही इमारत केवळ उंदीर-घुशींचे निवासस्थान झाले आहे.‘रेडेमहाल’ ही ऐतिहासिक इमारतीजवळच असणाऱ्या बाले किल्ल्यात गडावरील प्रमुख व्यक्तीस किंवा किल्लेदार अथवा राजांच्या भेटीस येणाऱ्या पाहुण्यांचे विश्रांतीस्थान होते. कालांतराने या इमारतीस रेड्यावरून धान्य आणलेल्या रेड्यांना बांधण्याचे ठिकाण झाले होते. म्हणून हा ‘रेडे महाल’ नावाने ओळखला जातो. छत्रपती ताराराणीच्या काळात कैद्यांना साखळदंडाने बांधण्याचे ठिकाण, पण नक्षीदार दोन मजली इमारतीची आतील रचना पाहता ही निवासी इमारत असावी आणि तो ‘डेरे महाल’ असावा, असा इतिहासतज्ज्ञांचा दावा आहे.आज ही ऐतिहासिक इमारत नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सध्या जनता बझार सहकारी ही संस्था अस्तित्वहीन अवस्थेत आहे. मग इमारत शाबूत ठेवायची असेल, तर इतिहासप्रेमींनी जागृत होऊन येथील हे धान्य दुकान हलविले पाहिजे. नाहीतर ही इमारत केवळ फोटोत पाहावयाची वेळ येणार आहे.‘रेडे महाल’ या ऐतिहासिक इमारतीबाबत जनता बझार व पन्हाळा नगरपरिषद यांच्यामध्ये न्यायालयीन वाद सुरू आहे. इमारत नगरपरिषदेच्या ताब्यात येताच त्याची उत्तम देखभाल करण्यास नगरपरिषद सक्षम आहे.- असीफ मोकाशी, नगराध्यक्ष पुरातत्त्व खात्याने नगरपरिषदेने इमारत ताब्यात घ्यावी म्हणून न्यायालयात धाव घेतली आहे.- नासीर शहा, विभागीय अधीक्षक, पन्हाळा पुरातत्त्व विभाग