शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी, सांगली पुढील फेरीत

By admin | Updated: November 25, 2015 00:54 IST

राज्यस्तरीय कबड्डी : मुलींमध्ये सिंधुदुर्ग, नाशिकची सरशी

सावंतवाडी : येथील जिमखाना मैदानावर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या राज्य मान्यतेने सुरू असलेल्या कुमार व कुमारी गट अजिंंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीच्या सायंकाळच्या सत्रात किशोर गटात मुंबई शहर संघाने नांदेड संघावर ५८-२४, तर सांगली संघाने नाशिक संघावर ४७-१५ अशी मात केली. रत्नागिरी संघाने लातूर संघावर १९-०७ गुणफरकांनी विजय मिळविला. कोल्हापूर संघाने हिंगोली संघाला २६-०७ असे नमवत पहिल्या सामन्यातील उणीव भरून काढत आघाडी घेतली. तसेच किशोरी गटात यजमान सिंधुदुर्ग संघाने उस्मानाबाद संघावर ३२-२६ अशी, तर नाशिक संघाने नांदेड संघावर ५५-६ अशी एकतर्फी मात केली. दुसऱ्या दिवशीच्या सायंकाळच्या सत्रात किशोर गटात मुंबई शहर संघाने नांदेड संघावर ५८-२४ अशी मात करीत आपली विजयी घोडदौड अखंडित ठेवली. मध्यंतराला मुंबई शहर संघाकडे ३९-०७ अशी भक्कम आघाडी होती. नांदेडच्या प्रकाश जाधव, अंकुश आडे यांनी चांगला खेळ केला. मुंबई उपनगर संघाने जालना संघावर ४५-०९ अशी मात करीत आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली. सामन्यात सुरुवातीपासूनच उपनगर संघाने जालना संघावर आक्रमण केले. सांगलीने नाशिकवर ४७-१५ अशी मात करीत आपली वाटचाल सुरू ठेवली. मध्यंतराला सांगली संघाकडे १५-०५ अशी आघाडी होती. सांगलीच्या कृष्णा मदने याने केलेल्या खोलवर चढाया व सुरेश कडलगे यांनी घेतलेल्या पकडींच्या जोरावर हा विजय मिळविला. रत्नागिरी संघाने लातूर संघावर १९-०७ असा विजय मिळविला. मध्यंतरानंतर रत्नागिरी संघाने आक्रमक खेळ करीत सुरेख पकडी घेत विजय खेचून आणला. कोल्हापूर संघाने हिंगोली संघाला २६-०७ असे नमवित विजय मिळविला. मध्यंतराला कोल्हापूर संघाकडे १४-४ अशी दहा गुणांची आघाडी होती. कोल्हापूरच्या सतीश ऐनवडे व अभिषेक गावडे यांनी चांगला खेळ केला, तर त्यांना जितेंद्र चव्हाण याने काहीसा प्रतिकार केला. पुणे संघाने नगर संघावर ४३-१३ अशी मात करीत सहज विजय मिळविला. (वार्ताहर)किशोरी गटात तुल्यबळ लढतीकिशोरी गटात यजमान सिंधुदुर्ग संघाने उस्मानाबाद संघावर ३२-२६ अशी सहा गुणांनी मात करीत विजय मिळविला. नाशिक संघाने नांदेड संघावर ५५-६ असा एकतर्फी विजय मिळविला. नाशिकच्या अश्विनी गायकवाड व मानसी वाझट यांनी चांगला खेळ केला. रायगड संघाने औरंगाबाद संघाचा ६६-८ असा धुव्वा उडवित धूळ चारली. पालघर संघाने कोल्हापूर संघाचा ३७-२२ असा पराभव केला.