शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी रंजन शर्मा, सात भाषा आहेत अवगत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 18:03 IST

सुनील फुलारी यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभाग (पूर्व) च्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती

कोल्हापूर : गृह विभागाने राज्यातील अप्पर पोलिस महासंचालक आणि विशेष पोलिस महानिरीक्षक श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या मोठ्या संख्येने बदल्या केल्या आहेत. त्यात कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी रंजन शर्मा यांची नियुक्ती झाली. तर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभाग (पूर्व) च्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

शर्मा पुणे पोलिस सहआयुक्तपदी कार्यरत होते. चार्टर्ड अकाउंटंट झाल्यानंतर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी म्हणून पोलिस दलात दाखल झाले. ते गेली १९ वर्षे पोलिस दलात आहेत. ते महाराष्ट्र कॅडरचे २००६ चे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी राज्य गुन्हे अन्वेषण विभागात विशेष पोलिस महानिरीक्षक, पुणे पोलिस आयुक्तालयात अतिरिक्त पोलिस आयुक्त (पूर्व विभाग) म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.

संघटित गुन्हेगारी विरोधातील कारवाई, पुणे येथील अवैध शस्त्रनिर्मिती रॅकेटविरोधातील कारवाईत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. मध्य प्रदेशातील उमरटी गावात पुणे पोलिसांनी केलेल्या छाप्यात शस्त्रनिर्मिती भट्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. वाहतूक व्यवस्थापन, पोलिस दलातील मनुष्यबळ वाढ आणि शिस्तबद्ध पोलिसिंग विषयावर त्यांनी अनेकदा भूमिका मांडल्या आहेत.

सात भाषा अवगत असलेले आयजी

महानिरीक्षक शर्मा यांना वाचनाची आवड आहे. त्यांना संस्कृत, हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, बंगाली आणि भोजपुरी या सात भाषा अवगत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Ranjan Sharma Appointed IG of Kolhapur; Proficient in Seven Languages

Web Summary : Ranjan Sharma is the new Inspector General of Kolhapur, replacing Sunil Fulari. Sharma, previously Pune's Joint Commissioner, is a 2006 batch IPS officer. Known for his role in cracking down on organized crime and illegal arms rackets, he is also proficient in seven languages.