शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अतिरेकी हल्ल्याच्या अफवेने तारांबळ

By admin | Updated: August 30, 2015 01:04 IST

उजळाईवाडी विमानतळ : पोलीस यंत्रणेची सतर्कता पडताळण्यासाठी रंगीत तालीम

कोल्हापूर : वेळ दुपारी साडेचारची... रक्षाबंधन असल्याने नेहमीपेक्षा शनिवारी रस्त्यावर नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात होती. काही पोलीस अधिकारी सणानिमित्त घरी होते. तर पोलीस आॅनड्युटी बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेले होते. प्रत्येक पोलीस ठाण्यात आठ ते दहाच कर्मचारी बसून होते. अचानक उजळाईवाडी विमानतळावर अतिरेकी हल्ला झाल्याचा निनावी दूरध्वनी पोलीस कंट्रोल रूमला आला. कंट्रोलरने त्वरित ही माहिती बॉम्बशोध पथकासह शहरातील पोलीस ठाण्यांना दिली. या संदेशाने अधिकाऱ्यांसह पोलिसांची तारांबळ उडाली. अवघ्या पंधरा मिनिटांत सशस्त्र पोलिसांची फौज घटनास्थळी पोहोचली. पटापट चालत्या गाडीतून पोलिसांनी उड्या मारत विमानतळ परिसराला घेराव घातला. मुख्य इमारतीमध्ये अतिशय सावधपणे जवान व पोलिसांनी प्रवेश केला. पाहतात तर सगळं काही शांत..शांत..आपले पोलीस सक्षम असल्याचे पाहताच पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी स्मितहास्य करीत सर्वांना ही रंगीत तालीम असल्याचे सांगितले. विमानतळावर अतिरेकी हल्ला झाल्याचा निनावी दूरध्वनी कंट्रोल रूमला येताच ड्युटीवर असलेल्या पोलिसांची बोबडीच वळली. त्यांनी हा संदेश शहरातील व उपनगरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिला. त्यानंतर तत्काळ पोलीस अधीक्षकांनाही संदेश दिला. पोलीस मुख्यालयातून पोलीस अधीक्षक, अप्पर अधीक्षक, उपअधीक्षक, क्राईम ब्रँच, बॉम्बशोध पथक, राज्य राखीव दल, स्पेशल कमांडर, जलद कृती दलाचे जवाण, शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी, बिट मार्शल, अग्निशामक दल, रुग्णवाहिकेसह डॉक्टरांचे पथक असा लवाजमा विमानतळावर पोहोचला. विमानतळाला चारही बाजूंनी वेढा घालून मिलिटरी जवान व सशस्त्र पोलिसांचे पथक मुख्य इमारतीच्या दिशेने चाल करून गेले. समोरून गोळीबार होऊ शकतो, ही खबरदारी घेत जवान व पोलीस आतमध्ये घुसले. पाहतात तर सगळं काही शांत... बॉम्बशोध पथकाने संपूर्ण परिसर पिंजून काढत एक बॉम्ब निकामी केला. तर दोन नकली अतिरेक्यांना ताब्यात घेतले. आॅपरेशन सक्सेस झाल्यानंतर त्यांनी अधीक्षक डॉ. शर्मा यांना कॉल दिला. त्यांनी घटनास्थळी येऊन स्मितहास्य देत, ये तो डेमो था भाई, असे म्हटल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. (प्रतिनिधी)