शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

‘रॅमकी’ कर्मचाऱ्यांचा मनपाच्या दारात ठिय्या

By admin | Updated: December 9, 2014 00:32 IST

किमानवेतनाची मागणी : आश्वासनानंतर माघार

कोल्हापूर : ‘रॅमकी इन्व्हायरो इंडिया लिमिटेड’कडे २००७ ते २०११ या क ालावधीत शहरातील कचरा उठावासाठी कमी मानधनावर राबणाऱ्या सफाई कामगारांना किमानवेतन कायद्याप्रमाणे वेतनातील फरकाचे ३ कोटी ७ लाख रुपये देण्याचे साहाय्यक कामगार आयुक्त सुहास कदम यांनी २ सप्टेंबर २०१४ला आदेश दिले. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने हक्काचे पैसे द्या, या मागणीसाठी आज, सोमवारी ‘रॅमकी’च्या कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या विठ्ठल रामजी चौकात ठिय्या आंदोलन केले. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी किमानवेतनासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.‘रॅमकी’ने कचरा उठाव करणाऱ्यांना द्यावयाच्या फरकाबाबत रक्कम ठरविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने साहाय्यक कामगार आयुक्तांना दिले होते. महापालिकेतर्फे शहरातील कचरा उठावचा ठेका घेतलेल्या ‘रॅमकी’ने सफाई कर्मचाऱ्यांना अठराशे रुपयांच्या ठोक मानधनावर कामावर घेतले होते. यावेळी ‘रॅमकी’ने किमानवेतन कायद्याचा भंग केल्याची तक्रार मुंबईतील महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनने उच्च न्यायालयात केली होती. न्यायालयाने किमानवेतन अधिनियमन १९४८ कलम (२०) नुसार किमानवेतन देण्याचे आदेश दिले. कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून साहाय्यक कामगार आयुक्तांना किमानवेतनाबाबत निर्णय घेण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या होत्या.याप्रकरणी गेली चार महिने सुहास कदम यांच्याकडे सुनावणी सुरू झाली. ‘रॅमकी’ची महापालिकडे किमान सव्वा कोटी रुपयांची अनामत रक्कम व दीड कोटी रुपयांची वाहने पडून आहेत. ही वाहने व अनामत रक्कम परत द्या किंवा यातून कामगारांचे पैसे भागवा, असा आदेश दिला. मात्र, याबाबत महापालिकेने अद्याप कार्यवाही केली नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या दारातच ठिय्या मारला. अतिरिक्त आयुक्तांच्या आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)