शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दिमाखाने कोसळणारा रामतीर्थ धबधबा पाण्याअभावी बंद

By admin | Updated: May 15, 2015 00:06 IST

पर्यटकांची निराशा : सोहाळे बंधाऱ्यात पाणी न अडविल्याचा परिणाम, लोकवर्गणीच्या वादात बरगेच घातले नाहीत

ज्योतीप्रसाद सावंत -आजरा येथील वर्षभर मोठ्या दिमाखाने कोसळणारा रामतीर्थ धबधबा पाण्याअभावी बंद झाला आहे. सोहाळे बंधाऱ्यात पाणी न अडविल्याने रामतीर्थ धबधब्यात पाणीच नाही. यामुळे पर्यटकांची घोर निराशा होत आहे.रामतीर्थ धबधबा हा पर्यटकांचे एक आकर्षणाचे ठिकाण आहे. वर्षभर पर्यटक रामतीर्थला भेट देऊन निसर्गसौंदर्याचा आनंद लुटत असतात. सोहाळे बंधाऱ्यात अडविले जाणारे पाणी एप्रिल, मे दरम्यान होणारा जोरदार वळवाचा पाऊस यामुळे मेअखेरपर्यंत रामतीर्थचा धबधबा कोसळत असतो.यावर्षी मात्र लोकवर्गणीच्या वादात सोहाळे बंधाऱ्यात बरगेच न घातल्याने पाणी अडविले गेलेले नाही. सोहाळे येथे पाणी न अडविल्याने साळगाव व देवर्डे बंधाऱ्यांमध्येही पाणी साठलेले नाही. परिणामी, हिरण्यकेशीचे पाणी वाहणे बंद झाले असून, नदीपात्रात ठिकठिकाणी डबक्यांचे स्वरूप निर्माण झाले आहे. त्यामुळे रामतीर्थ धबधब्यापर्यंत पाणीच येऊ शकत नाही. या सर्वांचा परिणाम म्हणून ‘रामतीर्थ’ धबधबा कोसळणे बंद झाले आहे. बहुतांशी पर्यटकांना याची कल्पना नाही. मात्र, पर्यटकांच्या गाड्या उन्हाळी सुट्यांमुळे रामतीर्थकडे वळत आहेत. पण पर्यटकांची धबधब्याऐवजी निराशा होत आहे. परंतु, रामतीर्थ येथील नदीपात्रातील पाण्याअभावी उघडे पडलेले महाकाय कातळ, नदीपात्रात टाकलेल्या अस्थी, राख, मातीची मडकी, केस याचेच दर्शन घ्यावे लागत आहे. प्यायलाही चांगले पाणी नाही. शीतपेय, चहा यांचीही व्यवस्था नाही. असाच काहीसा प्रकार असल्याने पर्यटकांची घोर निराशा होत आहे.रस्ता के व्हा होणार?तालुक्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत, असा कांगावा करणारी व तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळींना रामतीर्थकडे जाणाऱ्या रस्त्याची झालेली दुर्दशा दिसत नाही का? असा प्रश्न रस्त्याची अवस्था पाहून भाविक व पर्यटक करीत आहेत.