शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टी कारखानदारांना फितूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST

* स्वाभिमानीनेच एफआरपीवरील व्याज नको म्हणून दिले करारपत्र जयसिंगपूर : थकीत एफआरपीवरील पंधरा टक्के व्याज नको, असे करारपत्र स्वाभिमानी ...

* स्वाभिमानीनेच एफआरपीवरील व्याज नको म्हणून दिले करारपत्र

जयसिंगपूर : थकीत एफआरपीवरील पंधरा टक्के व्याज नको, असे करारपत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिरोळच्या श्री दत्त साखर कारखान्याला लिहून दिले आहे, असा आरोप आंदोलन अंकुश या सामाजिक संघटनेने पत्रकार बैठकीत केला. शेट्टी यांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, शेट्टी हे साखर कारखानदारांना फितूर झाले आहेत, असादेखील आरोप संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी केला.

उसाच्या थकीत एफआरपीवर १५ टक्के व्याज मिळावे, यासाठी आंदोलन अंकुश संघटनेकडून लढा सुरू आहे. आरआरसीअंतर्गत साखर आयुक्तांकडून कारखानदारांवर जप्तीची कारवाई होणार होती. मात्र, माजी खासदार शेट्टी यांच्यासह सावकर मादनाईक, पं.स. सदस्य सचिन शिंदे, अण्णासाहेब चौगुले, राजश्री गावडे या शेतकरी संघटनेच्या सभासद शेतकऱ्यांनी थकीत एफआरपीवरील १५ टक्के व्याजाची रक्कम नको, असे करारपत्रच संबंधित कारखान्याला लिहून दिले आहे, असे पुराव्यानिशी सांगून चुडमुंगे म्हणाले, साखर कारखानदारांशी संगनमत करून शेट्टी हे शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. साखर आयुक्त शेखर गायकवाड हेदेखील कारखानदारांच्या बाजूने आहेत. ७३०० ऊस उत्पादक सभासदांनी एफआरपीवरील १५ टक्के व्याजाची रक्कम नको, असे करारपत्र लिहून दिल्याने साखर आयुक्तांनी जप्तीची कारवाई रद्द केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु १५ टक्के व्याजासाठी आमचा लढा सुरू राहणार असून, याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचेही चुडमुंगे यांनी सांगितले.