शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

राजेश क्षीरसागर यांची आमदारकी रद्द करा

By admin | Updated: December 4, 2014 00:56 IST

सत्यजित कदम यांची याचिका : निवडणूक प्रतिज्ञापत्रात १५ गुन्ह्यांची माहिती लपविल्याचा आरोप

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आमदार राजेश क्षीरसागर यांनी निवडणूक विभागास सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दाखल गुन्हे व त्यांचा तपशील याची पूर्ण माहिती दिलेली नाही. पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे व प्रतिज्ञापत्राद्वारे दिलेली माहिती यांमध्ये मोठी तफावत आहे. क्षीरसागर यांनी १५ गुन्ह्यांची माहिती लपविली आहे. त्यामुळे क्षीरसागर यांची निवड रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी कॉँग्रेसचे पराभूत उमेदवार व नगरसेवक सत्यजित कदम यांनी आज, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे (याचिका क्रमांक २३/२०१४) केली. कदम यांनी लेखी निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. याबाबत क्षीरसागर यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता, उद्या, गुरुवारी सविस्तर स्पष्टीकरण करू, असे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीदरम्यान क्षीरसागर यांनी २० सप्टेंबर २०१४ रोजी निवडणूक आयोगास दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन वर्षे किंवा अधिक कालावधीच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध किंवा दोषारोप नसल्याचे म्हटले आहे. न्यायालयाचे नाव असलेले किंवा दखल घेतलेले २० गुन्हे शहर व जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात नोंद आहेत; तर विविध आंदोलने, मोर्चा, रास्ता रोको, आदी स्वरूपांचे इतर आणखी २० गुन्हे पोलिसांत नोंद असल्याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे क्षीरसागर यांनी दिली आहे. मात्र, याव्यतिरिक्त क्षीरसागर यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात (गुन्हा रजिस्टर नंबर ४६/२०१३, १५/२००४) लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे (४२/२००६, १०/२००९, १२४/२०१०, ९४/२०११, १५१/२०११, ३६/२०१२, १०/२००३, २/ २०१४), शाहूपुरी पोलीस ठाण्यात (१२/२००४, ९६/२०१३, १२०/२०१३, १०३/२०१२, ३६१/२००८) आदी १५ गुन्ह्णांची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली नसल्याचे कदम यांनी न्यायालयात सादर केलेल्या याचिकेत म्हटले आहे. क्षीरसागर यांनी गुन्ह्णाची अपुरी माहिती दिल्याने त्यांची निवड रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी कदम यांनी न्यायालयाकडे केली आहे. पक्षांतर्गत विरोधकांना आयते कोलीत राजेश क्षीरसागर व सत्यजित कदम यांच्यात चुरशीची लढत झाली. निवडणुकीनंतर दोघांत शहरातील रस्त्यांच्या उद्घाटन समारंभावरून संघर्ष सुरू झाला. यामध्ये महापालिका आयुक्तांनी हस्तक्षेप करीत राजशिष्टाचाराप्रमाणेच रस्त्यांची उद्घाटने होतील, असे स्पष्टीकरण केले; परंतु हा वाद तेथेच न थांबता आता उच्च न्यायालयापर्यंत गेला आहे. गेले दोन दिवस क्षीरसागर यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर कदम यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्याने खळबळ उडाली. कदम यांच्या याचिकेमुळे क्षीरसागर यांच्या मंत्रिमंडळातील सहभागास अडचणी निर्माण होऊ शकतात. याचिकेमुळे पक्षांतर्गत विरोधकांनाही आयते भांडवल मिळणार आहे.(प्रतिनिधी)