शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

‘राजाराम’ची निवडणूक रंगणार

By admin | Updated: October 6, 2014 22:43 IST

सतेज पाटील गट ‘वचपा’ काढणार : दक्षिण मतदारसंघातील राजकारणाच्या प्रतिक्रिया उमटणार

रमेश पाटील -- कसबा बावडा -आमदार महादेव महाडिक यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे सदस्य अमल महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश करून कोल्हापूर-दक्षिण विधानसभा मतदारसंघातून गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकल्याने त्याचे पडसाद डिसेंबरमध्ये होणाऱ्या ‘राजाराम’ साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर सतेज पाटील ‘राजाराम’च्या तयारीला लागतील अशी चर्चा आहे. आॅगस्ट २००९ मध्ये झालेल्या ‘राजाराम’च्या निवडणुकीत आमदार महाडिक यांच्या पॅनेलने ५०० ते ८०० अशा मताधिक्याने जागा जिंकल्या होत्या.नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार महाडिक यांनी कारखान्याच्या निवडणुकीची आपल्याला चिंता नाही, अशी टिप्पणी केली होती. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत पुतणे धनंजय महाडिक यांना मदत करूनही अमल महाडिक भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवित असल्याने सतेज पाटील यांचे कार्यकर्ते आता संतप्त झाले आहेत. केलेली मदत महाडिक विसरले, अशी चर्चा आता सुरू झाली आहे आणि त्यातूनच ‘राजाराम’च्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर सतेज पाटील प्रचंड ताकदीनीशी राजारामच्या निवडणुकीत उतरतील अशी शक्यता आहे.सन २००९ च्या राजारामच्या निवडणुकीत आमदार महाडिक यांच्या सत्ताधारी पॅनेलच्या विरोधात विनय कोरे, मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील, के. पी. पाटील, माजी खासदार निवेदिता माने असे दिग्गज नेते होते. मात्र, त्यांचा निसटता पराभव झाला. या निवडणुकीत संस्था प्रतिनिधी गटातून आमदार महादेवराव महाडिक, तर उत्पादक गट क्र. २ मधून त्यांचे चिरंजीव अमल महाडिक हे दोघे विजयी झाले होते. दरम्यान, या निवडणुका जूनमध्ये होतील, असे समजून सत्तारूढ महाडिक गटाने मोर्चेबांधणी केली होती. मात्र, निवडणुका सहकार प्राधिकरणाची नियुक्ती वेळेत झाली नसल्यामुळे तसेच विधानसभा आॅक्टोबरमध्ये जाहीर झाल्याने पुढे सरकल्या. आता त्या डिसेंबरमध्ये होणार आहेत.यापूर्वीच्या निवडणुका आमदार महाडिक यांनी एकतर्फी जिंकल्या होत्या. २००९ ची निवडणूक महाडिक यांना काहीशी जड गेली होती. कारण विरोधी गटाची धुरा मंत्री सतेज पाटील यांच्याकडे होती. आता तर अमल महाडिक विरोधात उभारल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी मंत्री पाटील आपली सर्व ताकद लावल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असे बोलले जाते. त्यामुळे ‘राजाराम’च्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत कधी झाली नसेल अशी ‘रंगत’ येत्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे, मात्र निश्चित...! १२२ गावांत कार्यक्षेत्रसध्या राजारामचे १५ हजार ८५२ सभासद आहेत. त्यापैकी अनुउत्पादक संस्था सभासद १३६ आहेत. करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, हातकणंगले, राधानगरी, कागल अशा सात तालुक्यांतील १२२ गावांत कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार करताना सर्वांचीच दमछाक होते.