सांगलीत जातपंचायतीविरोधात धरणे

By Admin | Updated: December 17, 2014 23:58 IST2014-12-17T23:43:25+5:302014-12-17T23:58:33+5:30

या पंचायतीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.

Raise against Sangli's Jat Panchayat | सांगलीत जातपंचायतीविरोधात धरणे

सांगलीत जातपंचायतीविरोधात धरणे

सांगली : इस्लामपूर येथील कोल्हाटी (डोंबारी) समाजाच्या जातपंचायतीच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ आज कोल्हाटी समाजाने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या पंचायतीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व रमेश मोरे, प्रकाश मोरे यांनी केले. आंदोलनाला वैभव शिंदे यांनी पाठिंबा दिला.
कोल्हाटी समाजाची इस्लामपूर येथे जातपंचायत असून, त्यांच्याकडून मनमानी कारभार सुरू आहे. समाजातून बहिष्कृत करणे, मनमानी दंड वसूल करणे, महिलांवर अत्याचार करणे, बालविवाहास प्रोत्साहन देणे, विचार व व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेणे, विवाहामध्ये हस्तक्षेप करणे, मनपसंत जोडीदारास पायबंद घालणे आदी प्रकार या जातपंचायतीकडून सुरू आहेत. यावर कायदेशीर कारवाई करून न्याय द्यावा, मोरे भावकीला समाजातून बहिष्कृत केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनामध्ये रवी मोरे, आक्काताई मोरे, बबिता मोरे, छाया मोरे सहभागी होते. (प्रतिनिधी)

Web Title: Raise against Sangli's Jat Panchayat