शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
2
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
6
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
7
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
8
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
9
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला, २ हजार ८२८ क्युसेकने विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 12:19 PM

पुन्हा धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता, पंचगंगेच्या पातळीत तीन इंचांची वाढ

कोल्हापूर : जिल्ह्यात काल शुक्रवार पासून पावसाचा जोर ओसरला असून, नद्यांची पाणी पातळी स्थिरावली आहे. दिवसभरात पंचगंगा नदीच्या पातळीत केवळ ३ इंचांची वाढ झाली असून, ५३ बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक काहीशी ठप्पच आहे. आगामी दोन दिवस जिल्ह्यासाठी ‘यलो’ अलर्ट दिल्याने पाऊस कमी होईल असा अंदाज आहे. कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावर केर्ली (ता. करवीर) येथे रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने काल, शुक्रवारी या मार्गावरील वाहतूक एकेरी सुरू होती.

धरण परिसरात पावसाचा जोर कमी असला तरी पाण्याची आवक सुरु असल्याने आज, शनिवारी पुन्हा राधानगरीधरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला. दुपारी १.१५ मिनिटांनी क्रमांक ६ हा दरवाजा खुला झाला. यातून १४२८ क्युसेकने विसर्ग सुरु आहे. तर पॉवर हाऊसमधून १४०० क्युसेक असा एकूण २८२८ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.गुरुवारी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पंचगंगा नदीची पातळी वाढू लागल्याने नागरिक चांगलेच धास्तावले होते. राधानगरी धरणाचे पाच दरवाजे खुले राहिल्याने विसर्ग वाढल्याने पंचगंगा धोका पातळी गाठणार असे वाटत असतानाच अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवल्याने नद्यांची पातळी संथगतीने वाढत गेली. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे राधानगरी धरणाचे पाच ही दरवाजे बंद झाले. शुक्रवार पहाटे एक दरवाजा तर सायंकाळी ७:३० नंतर चार ही स्वयंचलित दरवाजे बंद झाल्याने विसर्ग कमी झाला होता. आज शनिवारी दुपारी पुन्हा एक स्वयंचलित दरवाजा खुला झाल्याने पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. महापुराचा धोका सध्यातरी कमी दिसत आहे. पुराच्या भीतीपोटी कोल्हापूर शहरातील स्थलांतरित केलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी सोडण्यास सुरुवात झाली असली तरी काही नागरिक आपल्या मूळ घरात जात नाहीत.

पडझडीत १२.४२ लाखांचे नुकसानशुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात विविध ठिकाणी ३८ खासगी मालमत्तांची पडझड झाली. यामध्ये १२ लाख ४२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.अद्याप ३३ मार्ग बंदचजिल्ह्यातील विविध नद्यांना आलेल्या पुरामुळे राज्य मार्ग १० व प्रमुख जिल्हा मार्ग २३, असे ३३ मार्ग बंद आहेत. त्याशिवाय एसटीचेही अनेक मार्ग बंद राहिले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसradhanagari-acराधानगरीDamधरणriverनदी