शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
2
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्, राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
3
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
4
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
5
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
6
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
7
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
8
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
9
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
10
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
11
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
12
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
13
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
14
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
15
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
17
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
18
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
19
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
20
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाची उघडझाप, पंचगंगेची पातळी एक फुटाने कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 18:45 IST

जिल्ह्यात शुक्रवारी पावसाची उघडझाप राहिली. धरणक्षेत्रात चांगला पाऊस सुरू असून जलविसर्ग कायम आहे. नद्यांची पातळी हळूहळू कमी होत असून, पंचगंगेची पातळी दिवसभरात एक फुटाने कमी झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात पावसाची उघडझापपंचगंगेची पातळी दिवसभरात एक फुटाने कमी

कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी पावसाची उघडझाप राहिली. धरणक्षेत्रात चांगला पाऊस सुरू असून जलविसर्ग कायम आहे. नद्यांची पातळी हळूहळू कमी होत असून, पंचगंगेची पातळी दिवसभरात एक फुटाने कमी झाली आहे.

सकाळपासून जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू आहे. अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. कोल्हापूर शहर, करवीर, हातकणंगले, शिरोळ तालुक्यांत मात्र भुरभुरच राहिली. धरणक्षेत्रात पाऊस चांगल्या प्रकारे सुरू असून सरासरी ५० मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणातील कमी असून राधानगरी धरणातून वीजनिर्मितीसाठी प्रतिसेकंद १४०० घनफूट विसर्ग सुरू आहे.

वारणा धरण ८८ टक्के भरल्याने त्यातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. यातून प्रतिसेकंद ८३०१ घनफूट विसर्ग सुरू आहे. दूधगंगा धरण ९० टक्के भरले असून, त्यातून १८००, तर कासारी धरणातून १३०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांची पाणीपातळी संथगतीने कमी होत आहे.

शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १८.४९ मिलिमीटर पाऊस झाला. पंचगंगेची पातळी सायंकाळी सहा वाजेपर्यंत २८.४ फुटांपर्यंत होती. अद्याप १९ बंधारे पाण्याखाली असून दोन राज्य व दोन प्रमुख जिल्हामार्ग बंद आहेत. जिल्ह्यातील सहा खासगी मालमत्तांची पडझड होऊन दोन लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले.

धरणांतील पाणीसाठा, टीएमसीमध्ये -

राधानगरी (८.२८), तुळशी (३०.०६), वारणा (३०.१२), दूधगंगा (२२.७९), कासारी (२.२३), कडवी ( २.४४), कुंभी (२.२४), पाटगाव (३.५३).
 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर