शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत फटाके व्यापाऱ्यांवर छापे

By admin | Updated: May 10, 2015 00:48 IST

साठ्याची तपासणी : कवठेएकंदमधील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

सांगली : कवठेएकंद (ता. तासगाव) येथील ईगल फायर वर्क्स या फटाके कारखान्यात स्फोट होऊन ११ जणांचा बळी गेल्याने पोलिसांनी शनिवारी गणपती पेठ व चांदणी चौकातील तीन फटाके व्यापाऱ्यांच्या दुकानांवर छापे टाकले. दुकानात फटाक्यांचा किती साठा शिल्लक आहे, प्रत्यक्षात साठा करण्यासाठी किती परवानगी आहे, याची माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते, पण कारवाई जोरदार सुरू केली आहे. सांगलीत परवानाधारक फटाके व्यापाऱ्यांची यादी काढण्यात आली आहे. या प्रत्येक व्यापाऱ्यास त्याला परवाना देताना दुकानात फटाक्यांचा किती साठा ठेवायचा, याची अट घालून दिली आहे. व्यापाऱ्यांनी अटीचे पालन केले आहे का नाही तसेच सुरक्षिततेच्यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी तपासणीचे आदेश दिले होते. पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शिंदे, संजयनगर ठाण्याचे रवींद्र डोंगरे, शहर पोलीस ठाण्याचे राजू मोरे यांच्यासह पन्नासहून अधिक पोलिसांच्या पथकाने शनिवारी दुपारी गणपती पेठेतील दोन व चांदणी एक अशा तीन दुकानांवर छापे टाकले. फटाके परवान्याच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यामध्ये फटाक्यांचा किती प्रमाणात तसेच कोणत्या प्रकारचा साठा करण्यास परवानगी आहे, याची चौकशी केली. दुकानात असलेल्या साठ्याची रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. यामुळे आक्षेपार्ह काही आढळून आले का नाही, याची माहिती मिळू शकली नाही. याशिवाय ज्यांना फटाके विक्रीचा परवाना नाही, अशा काही किरकोळ व्यापारी फटाक्यांची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्याविरुद्धही कारवाई सुरु केली जाणार आहे. दरम्यान, मिरज, कुपवाडसह संपूण जिल्ह्यातील परवानाधारक फटाके विक्रेत्यांची यादी काढण्याचे आदेश पोलीसप्रमुख सावंत यांनी दिले आहेत. या सर्वांचा फटाके विक्रीचा परवाना व त्यांच्याकडीलही फटाके साठ्याची तपासणी रविवारपासून केली जाणार आहे. पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. दरम्यान, कवठेएकंदमध्येही सोमवारपासून पुन्हा तपासणी मोहीम सुरु करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) परवाना रद्द कवठेएकंदमधील ईगल फायर वर्क्समध्ये झालेल्या स्फोटात ११ जणांचा बळी गेल्याने त्याचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे, असे जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले की, कवठेएकंदमध्ये आणखी दोघे परवानाधारक फटाके तयार करण्याचे करखाने आहेत. त्यांचाही परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.