इचलकरंजीत खानावळीवर छापा ; मालकासह नऊ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:18 IST2021-06-05T04:18:44+5:302021-06-05T04:18:44+5:30

इचलकरंजी : शासनाच्या निर्बंधाचे उल्लंघन करून निरामय हॉस्पिटल परिसरात खानावळ सुरू ठेवल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी तेथे छापा टाकला. याप्रकरणी मालक, ...

Raid on Ichalkaranji restaurant; Crime on nine people, including the owner | इचलकरंजीत खानावळीवर छापा ; मालकासह नऊ जणांवर गुन्हा

इचलकरंजीत खानावळीवर छापा ; मालकासह नऊ जणांवर गुन्हा

इचलकरंजी : शासनाच्या निर्बंधाचे उल्लंघन करून निरामय हॉस्पिटल परिसरात खानावळ सुरू ठेवल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी तेथे छापा टाकला. याप्रकरणी मालक, कामगारांसह नऊ गिऱ्हाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

खानावळ मालक बबन अण्णासाहेब कांबळे (वय ४८), कामगार दाऊदमलिक बंदेनवाज उंचा (२५ रा. सुतार मळा), अनिस राजू बागवान (२१, रा. कृष्णानगर), शकील इकबाल लोकापूर (२०, रा. षटकोन चौक), प्रसाद सुभाष पाटील (३१, रा. मॉडर्न हायस्कूलजवळ), हरी टंकाप्पा नायर (५२, रा. एएससी कॉलेजजवळ), योगेश विजय चनविरे (३५), शीतल मनोहर बेडक्याळे (२७, दोघे रा. बुद्धविहार), साद आयुब मोमीन (२५, रा. पाटील मळा), सुधाकर वसंत कोळी (४२) व मनोहर पांडुरंग जनवाडे (४२, रा. टाकवडे, ता. शिरोळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

कोरोनाचा संसर्ग फैलावत चालल्याने राज्य शासनाने लॉकडाऊनसह निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधाचे उल्लंघन करून येथील निरामय हॉस्पिटल परिसरात संगम खानावळ सुरू असून, गिऱ्हाईकांना खानावळीत बसून जेवण दिले जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून गावभाग पोलिसांनी कारवाई केली.

Web Title: Raid on Ichalkaranji restaurant; Crime on nine people, including the owner