शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

रहिमतपूरला महिलांना धक्काबुक्की

By admin | Updated: November 15, 2014 00:05 IST

दहशत माजवली : सोळाजणांना पाठलाग करून पकडले

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे एका रस्त्याच्या कामावरून दहशत माजवून महिलांना धक्काबुक्की करणाऱ्या सोळाजणांना रहिमतपूर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. याप्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान ताब्यात घेतलेल्यांच्या अटकेची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रहिमतपूर हद्दीत ब्रह्मपुरीरोड नजीक असणाऱ्या चिखल ओढा परिसरात रस्ता खुला करण्याचे काम सुरू आहे. ते काम बंद करावे म्हणून हणमंत शंकर चव्हाण, रवींद्र हणमंत चव्हाण, अभिजित हणमंत चव्हाण, अविनाश हणमंत चव्हाण (सर्व रा. काशीद गल्ली, रहिमतपूर) यांनी स्वप्निल सुनील भोसले, गणेश शिवाजी भोसले (रा. समर्थनगर, सातारा), पंकज प्रल्हाद जाधव (रा. आकुर्डी, पुणे), भरत दिलीप शिंदे, प्रशांत लक्ष्मण कदम, अमोल मच्छिंद्र सूर्यवंशी, तुषार अर्जुन जाधव (रा. भक्तवडी, ता. कोरेगाव), अनिल नवनाथ माने (कोडोली-सातारा), रविकांत हणमंत अहिवळे (रा. संभाजीनगर), तुषार राजेंद्र जाधव (रा. चिंचणेर निंब), संदीप रघुनाथ जाधव, सुनील राजेंद्र शिंदे (मेघदूत कॉलनी, संभाजीनगर, सातारा) यांना बरोबर घेतले. या सर्वांनी मिळून विजय प्रल्हाद चव्हाण, ताई हणमंत चव्हाण, सावित्री हणमंत चव्हाण त्याचबरोबर भावकीतील अन्य काही लोकांना ‘रस्ता खुला करण्याचे काम बंद करा नाही तर तुमच्याकडे बघतो,’ असे धमकावले. यावेळी तलवारी आणि दांडक्याचा वापर करण्यात आला. (वार्ताहर)पोलिसांत गुन्हा दाखलघटनेची माहिती पोलिसांना समजल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. याचवेळी संबंधित दहशत माजविणारे इंडिका कार (एमएच ११ एके ४६२९), महिंद्रा लोगान कार (एमएच १४ बीसी ४२६८), दुचाकी (एमएच ११ एएच २६७१) यामधून पळून जाऊ लागले. मात्र, पोलीस आणि ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले. त्यांच्यावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, अधिक तपास एस. आर. गलांडे, जगदीश फणसे, प्रशांत पाटील करत आहेत.