शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरी ९० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढला

By admin | Updated: July 31, 2014 00:38 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आज, बुधवारी पावसाचा जोर वाढला आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आज, बुधवारी पावसाचा जोर वाढला आहे. धरण क्षेत्रातही दमदार पाऊस सुरू असून, राधानगरी धरण ९० टक्के भरले आहे. प्रतिसेकंद १८०० घनफूट पाण्याचा विसर्ग राधानगरीतून सुरू असल्याने धरण संथगतीने भरत आहे. तरीही पावसाचा जोर असाच राहिला तर येत्या दोन-तीन दिवसांत धरण पूर्णक्षमतेने भरण्याची शक्यता आहे. वारणा धरण ८७ टक्के भरले असून, बहुतांश धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात गेली दोन दिवस पावसाचा जोर वाढला आहे. आज सकाळ पासूनच कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस कोसळत आहे. एकसारखी रिपरिप असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात गगनबावडा तालुक्यात १०६ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. धरण क्षेत्रातही अतिवृष्टी झाली असून, धरणाच्या पातळीत वाढ होत आहे.राधानगरी धरण क्षेत्रात १२७ मिली मीटर, तर दूधगंगा धरणक्षेत्रात ९७ मिली मीटर पाऊस झाल्याने धरणांची पातळी वाढली आहे. वारणा धरणातून १७७५ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वारणा नदीच्या पातळी झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी पुन्हा २७ फुटांवर गेली आहे. जिल्ह्यातील २४ बंधारे पाण्याखाली गेले असून सात मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते. पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक काही प्रमाणात कमी दिसत होती. दरम्यान, गावडी (ता. शाहूवाडी) येथील आनंदा राजाराम केसरकर (वय ४०) यांचा ओढ्याच्या पाण्यातून वाहून जाऊन मृत्यू झाला. धमकवाडी-गावडी दरम्यानच्या ओढ्यात त्यांचा मृतदेह सापडला.तालुकानिहाय झालेला पाऊस असा -करवीर - १६.६९, कागल -२२.३१, पन्हाळा -२४, शाहूवाडी -३१, हातकणंगले -२, शिरोळ -३.५७, राधानगरी -४५.२७, गगनबावडा -१०६, भुदरगड -३४.८०, गडहिग्लज -१०, आजरा -४९.५०, चंदगड -४८.५०. (प्रतिनिधी)