शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

आर. डी. पाटील यांना सीसीटीव्ही फुटेजने तारले

By admin | Updated: October 14, 2015 01:04 IST

साडेतीन तासांच्या युक्तिवादानंतर अर्ज स्वीकारला

कोल्हापूर : भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आर. डी. पाटील हे दुपारी तीननंतर म्हणजे अर्ज भरण्याच्या वेळेनंतर निवडणूक कार्यालयात आले आहेत, असा आक्षेप घेत त्यांचा अर्ज स्वीकारू नये, अशी हरकत विरोधी उमेदवारांनी घेतली. तब्बल साडेतीन तासांच्या युक्तिवादानंतर व ‘सीसीटीव्ही फुटेज’च्या आधारावर ते कार्यालयात उपस्थित असल्याचे सिद्ध झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज रात्री दहाच्या सुमारास दाखल करून घेतला. त्यामुळे पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला. तब्बल सात तास त्यांना प्रतीक्षा करावी लागली.राजारामपुरी पोपटराव जगदाळे हॉल येथे अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी गर्दी झाली होती. शिवाजी उद्यमनगर प्रभागातून अर्ज भरण्यासाठी आलेल्या भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आर. डी. पाटील हे दुपारी दोनपूर्वीच निवडणूक कार्यालयात आले होते; परंतु प्रत्यक्षात ते अर्ज सादर करायला गेल्यावर त्यांना विरोधी उमेदवार सचिन पाटील, विशाल शिराळकर, दीपक स्वामी यांनी आक्षेप घेतला. ते अर्ज भरण्याची वेळ संपल्यानंतर म्हणजे तीननंतर आल्याची हरकत घेत त्यांचा अर्ज अडवून ठेवला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. अर्ज भरण्याची धावपळ सुरू असल्याने ती पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हा विषय हातात घेतला. सायंकाळी सातनंतर या प्रक्रियेला सुरुवात झाली. विरोधी उमेदवारांचे वकील शिवप्रसाद वंदुरे-पाटील व प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद करत आर. डी. पाटील हे महालक्ष्मी प्रभागातील रहिवासी असल्याने हा प्रभाग ज्या गांधी मैदान निवडणूक कार्यालयाच्या क्षेत्रात येतो तेथील निवडणूक अधिकाऱ्यांकडून तेथील मतदार यादीत त्यांचे नाव असल्याचा दाखला दुपारी ३.२० वाजता दिला आहे. तो दाखला जोडल्याशिवाय अर्ज भरता येत नाही. त्यामुळे ते या ठिकाणी गेले होते. तेथून आल्यानंतर ही वेळ टळून गेली होती, त्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकारू नये, असे म्हटले. त्यावर आपली बाजू मांडताना आर. डी. पाटील यांनी मी इथून बाहेरच गेलेलो नाही. पाहिजे असेल तर सीसीटीव्ही फुटेज पाहा, असे सांगितले. तोपर्यंत राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रा. जयंत पाटील व माजी महापौर आर. के. पोवार, बाबा पार्टे हे त्या ठिकाणी आले. त्यांनीही आक्षेप घेत अर्ज स्वीकारू नये, असे सांगून तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का? अशी आक्रमक होत विचारणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना केली. यावर ते म्हणाले, माझ्यावर कुणाचा दबाव नाही व मी कुणाचा दबाव घेत नाही.हे पदाधिकारी गेल्यानंतर ताराराणी आघाडीचे निमंत्रक सुनील मोदी हे वकील राजेंद्र किंकर यांना घेऊन याठिकाणी आले. त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन तुम्ही अर्ज भरून घ्यायला हवा होता, असे सांगितले. काही वेळात भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, जिल्हा सरचिटणीस राहुल चिकोडे ही येथे आले. तोपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या वकिलांना बोलावून घेतले. ते आल्यानंतर त्यांच्याशी बराच वेळ चर्चा करून सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी करण्यात आली. यामध्ये दुपारी तीनपूर्वी आर. डी. पाटील हे कार्यालयात असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी रात्री दहाच्या सुमारास भरून घेतला. अर्जासंबंधी सायंकाळी सात ते रात्री दहापर्यंत युक्तिवाद सुरू होता. निर्णयासाठी सात तास त्यांना प्रतीक्षा करावी लागली. या प्रक्रियेवळी दोन्हीकडील नेते व कार्यकर्ते जमल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (प्रतिनिधी)————————————————दाखला फाडल्याची चर्चाआर. डी. पाटील यांचे कार्यकर्ते गांधी मैदान निवडणूक कार्यालयातून प्रभागातील मतदार यादीतील नावाचा दाखला घेऊन जगदाळे हॉल येथील निवडणूक कार्यालय परिसरात आल्यावर त्यांना अडवून त्यांच्याकडून तो दाखला काढून घेत तो फाडला, अशी चर्चा उपस्थितांमधून होत होती. ————————(बातमीदार : प्रवीण देसाई)