शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मिणचे येथील शेळी-मेंढीपालन संस्थेत पिग्मीचे अडकले ५० लाख, एजंटानेच डल्ला मारल्याचा संस्थेचे म्हणणे 

By विश्वास पाटील | Updated: January 20, 2026 12:52 IST

पिग्मीधारक झाले हवालदिल

विश्वास पाटील

कोल्हापूर : मिणचे (ता. हातकणंगले) येथील महालक्ष्मी भटकी जमात शेळी-मेंढीपालन संस्थेकडे पिग्मी एजंटाने जमा केलेले सुमारे ५० लाख रुपये परत मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. ज्यांनी पैसे भरले आहेत ते लोक रोज संस्थेत हेलपाटे मारत आहेत; परंतु त्यांना संस्थाचालक दाद देत नाहीत. यासंबंधीची तक्रार स्वत: पिग्मी एजंट ओम सोमाजी वाकसे यांनी सहायक उपनिबंधक (दुग्ध) यांच्याकडे १३ जानेवारीस केली आहे.

परंतु वाकसे यांनी पिग्मीची रक्कम गोळा करून संस्थाचालकांना अंधारात ठेवून ती ३ टक्के व्याजाने परस्पर कर्जाने वाटली आहे. सचिवांना हाताशी धरून त्यांने हा उद्योग केला आहे. ओम वाकसे हे आमच्या कुटुंबांशी संबंधित आहे म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवला; परंतु त्यांनीच फसवणूक केली असून आता आपली चामडी वाचवण्यासाठी संस्थेची बदनामी करत आहेत. संस्थेत एक रुपयाचाही गैरव्यवहार झालेला नाही आणि सर्व पिग्मीधारकांचा एक रुपयाही आम्ही बुडवणार नाही, असे संस्थेचे संस्थापक प्रवीण वाकसे यांनी स्पष्ट केले. ओम वाकसे याच्याकडेच संस्थेचे ३२ लाख अडकले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

या संस्थेचे कार्यालय गावातच ग्रामपंचायतीचा गाळा घेऊन त्यामध्ये सुरू आहे. संस्थेची मूळ नोंदणी २००८-०९ ची आहे; परंतु त्याचे लेखापरीक्षण २०१८पासून झालेले नाही. परिणामी पिग्मीची रक्कम किती थकीत आहे, संस्थेच्या ठेवींचे काय केले आहे, यासंबंधीची माहिती सहकार विभागाकडेही उपलब्ध नाही; परंतु सुमारे २०० ते २५० खातेदारांच्या सुमारे ५० लाख रुपये जे पिग्मीच्या स्वरुपात संस्थेत जमा केले होते ते अडकले आहेत. व्यापारी, शेतकरी, औषध दुकानदार, दूध उत्पादक रोज पिग्मी जमा करत होते. गेल्या काही दिवसांपासून ही रक्कम परत मिळत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत.

पिग्मी एजंट ओम वाकसे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेत पिग्मी एजंट म्हणून काम करत आहे; परंतु गेल्या एक वर्षापासून या संस्थेकडे जमा केलेली पिग्मी परत मिळालेली नाही. या संस्थेकडून कोणतीही शिक्क्याची पावती दिली जात नव्हती. पावतीवर सेक्रेटरी पद्मश्री धन्यकुमार देसाई व क्लार्क स्वाती सुभाष कागले यांच्या सह्या आहेत. कांही पावतीवर त्यांच्या सह्याही नाहीत. संस्थेच्या रजिस्टरला मात्र सर्व नोंदी आहेत.

संस्थेचे संस्थापक प्रवीण नारायण वाकसे, अध्यक्ष तानाजी महादेव वाकसे व संचालक मंडळ संगनमताने ही रक्कम परत देण्यास टाळाटाळ करत आहेत. मी पिग्मीचा कालावधी पूर्ण झाली आहे अशी ५५ लाखांची रक्कम या संस्थेत जमा केली आहे. आता पिग्मीधारकांचा कोणताही संबंध नसल्याचे संस्था म्हणत आहे. तरी संस्थेवर दप्तर तपासणी करून संस्थेविरुद्ध कारवाई करावी.

वाकसे यांचा तक्रार अर्ज मिळाला आहे. त्यानुसार या संस्थेचे शासकीय लेखापरीक्षण करून घेण्यासाठीचा प्रस्ताव मुंबई कार्यालयाकडे पाठवला आहे. तिकडून ऑर्डर आल्यावर तातडीने लेखापरीक्षण करून घेऊ. त्याशिवाय नक्की किती रकमेचा घोळ आहे, हे समजणार नाही. - प्रदीप मालगावे, सहायक निबंधक, दुग्ध, कोल्हापूर

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Pigmy agent allegedly embezzled ₹50 lakhs from sheep-goat organization.

Web Summary : A pigmy agent allegedly embezzled ₹50 lakhs from a Kolhapur sheep-goat organization. Depositors are distressed as funds are missing. The agent accuses the organization of fraud, while the organization blames the agent for misappropriation. An audit is pending to ascertain the truth.