सरवडेतील प्रा.आ. केंद्रास रुग्णवाहिका लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:45 IST2021-02-06T04:45:07+5:302021-02-06T04:45:07+5:30

राज्यातील राष्ट्रीय मानांकन मिळवणारे राज्यातील पहिले आरोग्य केंद्र म्हणून सरवडे केंद्राची ओळख आहे. या केंद्रातर्गत ७ उपकेद्रांचा समावेश आहे. ...

Pvt. Dedication of ambulance to the center | सरवडेतील प्रा.आ. केंद्रास रुग्णवाहिका लोकार्पण

सरवडेतील प्रा.आ. केंद्रास रुग्णवाहिका लोकार्पण

राज्यातील राष्ट्रीय मानांकन मिळवणारे राज्यातील पहिले आरोग्य केंद्र म्हणून सरवडे केंद्राची ओळख आहे. या केंद्रातर्गत ७ उपकेद्रांचा समावेश आहे. या केंद्रांने योजनेच्या व माध्यमातून लोकसहभागातून संपूर्ण आरोग्य केंद्राचे रूप बदलून आरोग्यदायी सेवा देणारे केंद्र म्हणून ओळख निर्माण केली आहे. यामुळे या केंद्रामध्ये उपचार घेण्यासाठी दिवसेंदिवस रुग्णाची संख्या वाढत आहे. यामुळे या केंद्राला रुग्णवाहिकेची आवश्यकता होती. त्यामुळे ना. हसन मुश्रीफ यांच्या सहकार्यातून सदरची रुग्णवाहिका मिळाल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य आर.के. मोरे यांनी दिली. यावेळी जि.प. सदस्य सौ. सविता चौगले, उपसभापती मोहन पाटील, पंचायत समिती सदस्या सौ. कल्पनाताई मोरे, शिवानी पाटील, वैद्यकीय अधिकारी स्वप्नील माळवदे, सरपंच सौ. मनोज्ञा मोरे, उपसरपंच शशीकला मोरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य, सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. तुकाराम कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. वैद्यकीय अधिकारी एस.एस. माळवदे यांनी आभार मानले.

..........

फोटो

सरवडेतील रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यास उपस्थित विजयसिंह मोरे, राजेंद्र पाटील, डॉ. आर.आर. शेट्ये.

Web Title: Pvt. Dedication of ambulance to the center