पिंपळगावमधील स्पर्धेत हसूरचा पुंडलिक भोसले विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:26 IST2021-02-09T04:26:57+5:302021-02-09T04:26:57+5:30

ग्रामीण भागातील मुलांना सैन्य भरतीसाठी प्रोत्साहन मिळावे, याकरिता येथील रॉयल क्लबने या भव्य १६०० मीटर रानिंग स्पर्धेचे आयोजन केले ...

Pundalik Bhosale of Hasur won the competition in Pimpalgaon | पिंपळगावमधील स्पर्धेत हसूरचा पुंडलिक भोसले विजेता

पिंपळगावमधील स्पर्धेत हसूरचा पुंडलिक भोसले विजेता

ग्रामीण भागातील मुलांना सैन्य भरतीसाठी प्रोत्साहन मिळावे, याकरिता येथील रॉयल क्लबने या भव्य १६०० मीटर रानिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रथम क्रमांक ३००१ रुपये, द्वितीय क्रमांक २००१ रुपये, तृतीय क्रमांक १००१ रुपये, चतुर्थ क्रमांक ५०१ रुपये, पाचवा क्रमांक ३०१ रुपये असे बक्षिसांचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत भाग घेतलेल्या १ ते २१ स्पर्धकांना सन्मानचिन्ह देण्यात आले तर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. या स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे- प्रथम क्रमांक- पुंडलिक भोसले (हसूर), द्वितीय क्रमांक- आकाश बामणे (बेळगाव), तृतीय क्रमांक- अनिकेत कुटरे (चंदगड), चतुर्थ क्रमांक- प्रकाश पोवार (पांगिरे), पाचवा क्रमांक- अभिजीत नाईक (अर्जुनवाडी) तसेच सहा ते आकरा क्रमांक विजेते पुढीलप्रमाणे- रवींद्र कांबळे (बेलेवाडी), सूरज फरक्ते (मांगनूर), आकाश चव्हाण (हनिमनाळ), सुशांत पोटे (मलिग्रे), निशांत तोरासे (वाघापूर), वैभव पाटील (बामणे).

Web Title: Pundalik Bhosale of Hasur won the competition in Pimpalgaon