शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

सुविधा दिल्यास अन्य राज्यांत जाणार नाही

By admin | Updated: November 10, 2014 00:46 IST

सुविधा प्रश्न : गोशिमा उद्योजकांची भावना

कणेरी : महाराष्ट्र शासनाने पायाभूत सुविधांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्यास महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यांत जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे मत गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (गोशिमा)च्या उद्योजकांनी व्यक्त केले.गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीसाठी जादा जागा व सुविधा मागणीसाठी उद्योजकांच्या शिष्टमंडळासह नूतन उद्योगमंत्री प्रकाश मेहता व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सचिव भूषण गगरानी यांची भेट घेणार असल्याचे ‘गोशिमा’चे मावळते अध्यक्ष उदय दुधाणे यांनी सांगितले. आघाडी सरकारच्या काळात मंत्री, अधिकारी, यांनी आपल्या पै-पाहुण्यांच्या नावावर केवळ गुंतवणूक म्हणून खरेदी केलेले औद्योगिक वसाहतीमधील भूखंड शासनाने परत द्यावेत व अधिकारी, राजकीय लोकांचे भूखंड उद्योगांसाठी खुले करावेत, असे मतही यावेळी उद्योजकांनी मांडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री प्रकाश मेहता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगरानी यांच्या उद्योगांबाबतच्या धोरणांचे उद्योजकांनी यावेळी कौतुक करून अभिनंदन केले. यावेळी ज्येष्ठ उद्योजक चंद्रकांत जाधव, नूतन अध्यक्ष अजित आजरी, देवेंद्र दिवाण, सेक्रेटरी जे. आर. मोटवाली, राहुल बुधले, आर. पी. पाटील, मोहन पंडितराव, एस. एस. पाटील, सुरजितसिंह पवार, आदींनी मनोगत व्यक्त केले. कोल्हापूरच्या प्रादेशिक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयासह अधिकाऱ्यांबाबत उद्योजकांनी नाराजी व्यक्त करून अधिकारी भूखंड देण्यासाठी निरुत्सुक असल्याचे सांगून उद्योजकांना कामाबाबत उडवाउडवीची उत्तरे देतात, अशी नाराजी उद्योजकांनी व्यक्त केली. महामंडळाच्या कार्यालयातील कारभाराची वरिष्ठ पातळीवर चौकशी झाली तर अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येतील, अशा भावनाही यावेळी उद्योजकांनी व्यक्त केल्या. (वार्ताहर)