पेरणोली ग्रामपंचायतीला स्ट्रेचर प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:26 IST2021-08-23T04:26:53+5:302021-08-23T04:26:53+5:30

पेरणोली (ता. आजरा) येथील ग्रामपंचायतीला युवा भारत सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थेतर्फे मृत व्यक्तीला अंत्यविधीस्थळी बांबूच्या स्ट्रेचरमधून नेताना नागरिकांना ...

Provide stretcher to Pernoli Gram Panchayat | पेरणोली ग्रामपंचायतीला स्ट्रेचर प्रदान

पेरणोली ग्रामपंचायतीला स्ट्रेचर प्रदान

पेरणोली (ता. आजरा) येथील ग्रामपंचायतीला युवा भारत सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थेतर्फे मृत व्यक्तीला अंत्यविधीस्थळी बांबूच्या स्ट्रेचरमधून नेताना नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन मृतदेह व्यवस्थित नेण्यासाठी लोखंडी स्ट्रेचर प्रदान करण्यात आले.

यावेळी संस्थापक-अध्यक्ष कृष्णा सावंत म्हणाले, बांबूचे स्ट्रेचर तयार करणे नागरिकांना जिकिरीचे ठरते. बांबूच्या माध्यमातून पैशांची बचत करणे, ग्रामस्थांचा त्रास कमी करणे या उद्देशाने स्ट्रेचर प्रदान करण्यात आले.

या वेळी उपसरपंच उत्तम देसाई, सदस्य संदीप नावलकर, संतोष देसाई यांनी मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी ग्रामपंचायतीचे सदस्य बाबासाहेब लोखंडे, काकासाहेब देसाई, शुभम सुतार, महेश सुतार, स्वप्निल सावंत, एकनाथ फगरे, आकाश कालेकर, विनायक रेळेकर, आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : पेरणोली (ता. आजरा) येथील ग्रामपंचायतीला स्ट्रेचर प्रदान करताना कृष्णा सावंत, उपसरपंच उत्तम देसाई, संदीप नावलकर, काकासो देसाई, शुभम सुतार, संतोष देसाई, महेश सुतार, आदी उपस्थित होते.

क्रमांक : २१०८२०२१-गड-०२

Web Title: Provide stretcher to Pernoli Gram Panchayat