मुरगूडच्या विकासासाठी २० कोटी निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:20 IST2021-01-14T04:20:08+5:302021-01-14T04:20:08+5:30

मुरगूड शहरात सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कामांतर्गत पाईपलाईन बसविताना रस्ते खुदाई झाल्याने रस्त्याची कामे नव्याने करावी लागणार आहेत. त्यासाठी ...

Provide Rs. 20 crore for the development of Murgud | मुरगूडच्या विकासासाठी २० कोटी निधी द्या

मुरगूडच्या विकासासाठी २० कोटी निधी द्या

मुरगूड शहरात सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कामांतर्गत पाईपलाईन बसविताना रस्ते खुदाई झाल्याने रस्त्याची कामे नव्याने करावी लागणार आहेत. त्यासाठी १० कोटी खर्च अपेक्षित आहे. शासनाकडून विशेष रस्ता अनुदानातून १० कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी नगरविकास मंत्री ना. शिंदे यांच्याकडे करण्यात आली.

येथील सदाशिवराव मंडलिक कुस्ती संकुलशेजारी खुल्या जागेत इनडोअर गेम संकुल बांधकामकरिता ७ कोटींची मागणी करण्यात आली आहे. तसेच मुरगूडच्या पुरातन धार्मिक मारुती मंदिराच्या सांस्कृतिक भवनासाठी तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत ३ कोटींचा निधी मिळावा, अशीही मागणी नगरपालिकेच्यावतीने शासनाकडे करण्यात आली आहे.

पालिकेच्यावतीने शहरातील या प्रमुख तीन विकास कामांकरिता २० कोटींच्या निधीच्या मागणीचे निवेदन नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याप्रसंगी दिले. यावेळी खासदार संजय मंडलिक यांनीही मंत्री महोदयांकडे मुरगूडसाठी भरीव निधी मिळण्याचा आग्रह धरला. आपण लवकरच यावर निर्णय घेऊन निधी मंजूर करू, अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

फोटो ओळ :-

मुरगूड शहरातील विविध विकासकामांसाठी सुमारे वीस कोटींचा निधी मिळावा, या आशयाचे निवेदन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना देताना नगराध्यक्ष राजेखान जमादार, सोबत खासदार संजय मंडलिक व अन्य.

Web Title: Provide Rs. 20 crore for the development of Murgud