शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”
2
"नेहरू नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे, पण महाराष्ट्रात...! तुमची मस्ती इकडे नाही चालणार"; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
"पक्षात ज्येष्ठ नेत्यासारखे फिरतात पण साधा बूथ जिंकू शकत नाही"; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं
4
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
5
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
6
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
7
दरोडा दहा लाखाचा अन् तपासात मिळाले अडीच कोटी; ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवून दरोडा
8
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : पोलिसांनी ससूनला सादर केलेल्या अहवालानंतर चर्चा
9
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
10
गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..! 
11
भयानक! सवाई माधोपुरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात वाघ आला, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन गेला
12
कागदपत्रे नसतील तर जुन्या मशिदींचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने 'वक्फ बाय युजर'वर मागितले केंद्राकडे उत्तर
13
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
14
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅनर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
15
"कोर्टाच्या आदेशाची माहिती नव्हती"; नागपूर दंगलीच्या आरोपीचे घर पाडल्यानंतर पालिकेने मागितली माफी
16
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...
17
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
18
थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या
19
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
20
"गरज पडेल तेव्हा माझा वापर..."; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवरच दिला राजीनामा

Kolhapur- रत्नागिरी-नागपूर महामार्ग भूसंपादन; आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; राजू शेट्टींनी सरकारला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 16:23 IST

मंत्र्यांना व लोकप्रतिनिधींना कामाच्या टक्केवारीत जास्त रस

कोल्हापूर: रत्नागिरी - नागपूर महामार्ग भुसंपादनास विरोध करणा-या शेतक-यांना हातकंणगले पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी हातकणंगले पोलिस ठाण्यात शेतकऱ्याची भेट घेत सरकारला इशारा दिला. राज्य सरकारने बळाचा वापर केल्यास जशास तसे उत्तर देवू. तसेच ६ तारखेच्या दौ-यावेळी मुख्यमंत्र्यांना स्वाभिमानी स्टाईलने जाब विचारणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.रत्नागिरी - नागपूर महामार्गासाठी भुसंपादन केले जात आहे. चौपट मोबदला देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे एक वर्षापासून प्रलंबित आहे. मोबदला दिल्याशिवाय शेतकरी मोजणी करू न देण्यावर ठाम आहेत. तरी शेतक-यांना कोणत्याही नोटीसा न देता हुकुमशाही पध्दतीने भुसंपादन सुरु आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकरी व राज्य सरकार विरोधात हा संघर्ष सुरू असून पोलिस बळाचा वापर करून बळजबरीने रस्ता करण्याचा प्रयत्न करत आहेत. याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आज, शुक्रवारी हातकणंगले पोलिसांनी ताब्यात घेवून अटक केली.यानंतर राजू शेट्टी यांनी थेट पोलिस ठाणे गाठत शेतक-यांची भेट घेतली. दरम्यान, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी फोनवर चर्चा केली. शेतक-यांच्या विरोधात बळजबरीचा वापर केल्यास सांगली कोल्हापूर महामार्ग बेमुदत बंद करणार असल्याचा इशाराही दिला. राज्यातील मंत्र्यांना व लोकप्रतिनिधींना कामाच्या टक्केवारीत जास्त रस असल्याने शेतक-यांचा निर्णय घेण्यास यांना वेळ नसल्याचा आरोपही यावेळी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गRatnagiriरत्नागिरीnagpurनागपूरFarmerशेतकरीagitationआंदोलनPoliceपोलिसRaju Shettyराजू शेट्टी