शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

उंदरगावच्या मनोहर भोसलेचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:28 IST

वाघापूर : संत सद्गुरू श्री बाळूमामा यांच्या नावाने आर्थिक हितसंबंध जोपासणाऱ्या व बाळूमामा भक्तांची लूट करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील उंदरगाव ...

वाघापूर : संत सद्गुरू श्री बाळूमामा यांच्या नावाने आर्थिक हितसंबंध जोपासणाऱ्या व बाळूमामा भक्तांची लूट करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील उंदरगाव येथील मनोहर चंद्रकांत भोसले याचा आदमापूर ग्रामपंचायतीच्या वतीने मासिक सभेत धिक्कार व निषेध केला आहे. अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करावी, असा ठराव सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्या सहीने मंजूर करण्यात आला आहे.

मनोहर भोसले हे अलीकडे आपणच संत बाळूमामांचे शिष्य, अवतार, वंशज असल्याचे सांगून बाळूमामा भक्तांची दिशाभूल करत आहेत. अलीकडे त्यांच्याविषयी अनेक तक्रारी आल्या आहेत.

संत सद्गुरू बाळूमामा हे शिव-शेषाचे अवतार घेऊन धनगर कुळात जन्म घेऊन आदमापूर येथे समाधिस्त होऊनही भक्तांना आपल्या मेंढ्यारूपी कळपात अजूनही अस्तित्वाचा पुरावा देणारे सद्गुरू श्री बाळूमामा एकच आहेत. अध्यात्म, ध्यान, धारणा, भक्ती, श्रद्धा एकच आहेत. मात्र, काही अजाण अनादी काळापासून आपणच देव असल्याचे भासवून समाजाला फसवत आहेत. हे बाळूमामांच्या तत्त्वात बसत नाही. त्यांनी आपल्या संपूर्ण अवतार काळात कोणाकडूनही एक दाम घेतला नाही; परंतु मनोहर भोसले हा बाळूमामांच्या नावाने समाजाची आर्थिक लूट करत आहेत. त्यामुळे आम्ही ग्रामपंचायत आदमापूरच्या वतीने मनोहर भोसले याचा निषेध करत आहोत, असा उल्लेख निषेध ठरावात आहे.