संरक्षित वनक्षेत्रात चंदगडमधील २३ गावांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:22 IST2021-04-13T04:22:36+5:302021-04-13T04:22:36+5:30

चंदगड तालुक्यात हत्तीसह अन्य वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून राज्य वन्यजीव मंडळाच्या संवर्धन राखीव वनक्षेत्राच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर ...

The protected forest area includes 23 villages in Chandgad | संरक्षित वनक्षेत्रात चंदगडमधील २३ गावांचा समावेश

संरक्षित वनक्षेत्रात चंदगडमधील २३ गावांचा समावेश

चंदगड तालुक्यात हत्तीसह अन्य वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून राज्य वन्यजीव मंडळाच्या संवर्धन राखीव वनक्षेत्राच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर आता कोल्हापूर वनविभागाच्या कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्गातील ७ वनक्षेत्रांना संवर्धन राखीव वनक्षेत्राचा (कॉन्झर्व्हेशन रिझर्व्ह) दर्जा मिळाला आहे.

१५ मार्च २०२१ च्या राजपत्रात याची नोंद झाली आहे. चंदगड तालुक्यातील २३ गावांसह पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील ५७ गावे संरक्षित वनक्षेत्रात समाविष्ट केली आहेत. याची अधिसूचना राज्याचे वनउपसचिव गजेंद्र नरवणे यांनी नुकतीच काढली आहे.

चंदगड तालुक्यातील २३ गावे संरक्षित क्षेत्रात समाविष्ट आहेत. तालुक्यातील २२५.४ चौरस किलोमीटर अधिवास क्षेत्र उपलब्ध झाले आहे. यामध्ये आडुरे, भोगोली, गुडवळे खालसा, ईसापूर, झांबरे, कोकरे, नागवे, न्हावेली, पिळणी, उमगाव, वाघोत्रे, जेलुगडे, पार्ले, कळसगादे, गुळंब, कलिवडे, किटवडे, कोदाळी, कोलिक, म्हाळुगे खालसा, हाजगोळी, जंगमहट्टी, माडळवे या गावांचा समावेश आहे.

या वनक्षेत्राला या वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत संरक्षण मिळाले आहे.

Web Title: The protected forest area includes 23 villages in Chandgad